व्याघ्र प्रकल्पांतर्गत पुनर्वसनासाठी पॅकेज

Loading

चंद्रपूर : संरक्षित अभयारण्य आणि व्याघ्र प्रकल्पांच्या क्षेत्रातील गावांच्या पुनर्वसनाला वेग यावा, यासाठी वनविभागाने नवे निर्णय घेतले आहेत. त्या अंतर्गत पुनर्वसन करताना अधिकच्या मोबदल्यासाठी विशेष पॅकेजसोबतच पुनर्वसित बफर आणि कोअर झोनमधील उमेदवारांना वनविभागाच्या पदभरतीदरम्यान अधिकचे गुण दिले जातील, अशी माहिती वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपुरात दिली.
अनेक क्षेत्रातील पुनर्वसन अडल्याने कामे खोळंबली आहेत. पर्यायाने वन पर्यटनामध्ये अडथळे येत आहेत. पुनर्वसन होऊ घातलेल्या गावकऱ्यांना सध्या असलेल्या जमिनीच्या चौपट मोबदला देण्याचा निर्णय सरकार घेत असल्याचे सांगून वनमंत्री म्हणाले, कोअर क्षेत्रातील पुनर्वसन करताना आता ३० लाख रुपयांपर्यंतची मदत देण्यासही सरकारची तयारी आहे. या क्षेत्रातील सुशिक्षित बेरोजगारांना वनविभाच्या पदभरतीमध्ये विशेष प्राधान्य
दिले जाणार आहे. विशेष बाब
म्हणून या पदभरतीदरम्यान, कोअरमधील उमेदवारांना सात गुण आणि बफरमधील उमेदवारांना अधिकचे पाच गुण दिले जाणार असल्याचे वनमंत्र्यांनी सांगितले.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *