
दिग्दर्शक अली अब्बास जफर यांच्या ‘सुलतान’ चित्रपटात सलमान खान ४० वर्षांच्या हरियाणी पैलवानाची भूमिका साकारत असून आदित्य चोप्रा या चित्रपटाचा निर्माता आहे. या वर्षी ‘ईद’ला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.
बॉलिवूडमधील आघाडीची अभिनेत्री असलेली अनुष्का शर्मा आता तिनही ‘खान’ सोबत काम करणारी अभिनेत्री बनली आहे. पदार्पणातच तिने शाहरुख खानसोबत ‘रब ने बना दी जोडी’ व नंतर‘जब तक है जान’मध्ये काम केले तर गेल्या वर्षी आलेल्या ‘पीके’मध्ये ती आमिर खानसोबत झळकली. आणि आता सुलतानद्वारे ती सलमानसोबत काम करणार आहे