कर्मचार्‍यांनी केला दोन कोटींचा अपहार अपहाराचा गोषवारा..

Loading

अकलूज : येथील सुमित्रा पतसंस्थेत पतसंस्थेच्याच कर्मचार्‍यांनी दोन कोटी दोन लाख ३२ हजार २९६ रूपयांचा अपहार केल्याची तक्रार संस्थेचे लेखापरिक्षक चंद्रशेखर रायचंद्र दोशी यांनी अकलूज पोलिसांकडे दाखल केली आहे. यात मुख्य कार्यालय शाखेचे सरव्यवस्थापक दिलीप गजानन लोणकर, शाखा व्यवस्थापक हरी लक्ष्मण जगताप, शाखाधिकारी अर्जुन मारुती जगताप, भारत सुंदाप्पा गोरवे, संगणकप्रमुख रमेश कुंडलिक मोरे, लिपिक दिनकर दगडू भोसले, नंदकुमार सुरेश देवकुळे या कर्मचार्‍यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (वार्ताहर) अपहाराचा गोषवारा.. ■ मुख्य कार्यालय – एक कोटी ५६ लाख ६८ हजार रुपये ■ भाजी मंडई शाखा – १४ लाख तीन हजार ८१0 ■ जयशंकर उद्यान शाखा – ३१ लाख ६0 हजार ४८६ ■ एकूण अपहार – दोन कोटी दोन लाख ३२ हजार २९६ रु

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *