सोलापूर : विजापूर नाका परिसरात तीन घरफोड्या केलेल्या अट्टल गुन्हेगारास गुन्हे शाखेच्या पोलिसांनी गुरुवारी शिताफीने अटक केली. त्याच्याकडून चोरीतील ६0 हजार रुपये किमतीचे सोन्या,चांदीचे दागिने हस्तगत करण्यात आले.
बाळू गौतम मस्के (वय २९, रा. विजापूर नाका झोपडपट्टी क्र.१) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. सपोनि रणजित माने व अन्य कर्मचारी हे गस्त घालत असताना बातमीदारामार्फत बाळू मस्के हा सैफुल येथील नडगिरी पेट्रोल पंपाजवळील चहा कॅन्टीनमध्ये बसल्याची माहिती मिळाली. त्यानुसार सपोनि रणजित माने यांनी तेथे जाऊन बाळू मस्के याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने त्याच्या साथीदारासह तीन घरफोड्या केल्याचे कबूल केले. पोलिसांनी त्याच्याकडे गुन्ह्यात चोरलेले ६0 हजार रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने हस्तगत केले. ही कामगिरी पोलीस आयुक्त रवींद्र सेनगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली