
चळे येथील भीमा नदीच्या पात्रातील पाणी आटले आहे. यामुळे मोठय़ा प्रमाणात वाळू उपसा सुरू आहे. याबाबत महसूल प्रशासनाकडून दुर्लक्ष होत आहे. सध्या चळे येथील दर्लिंग मंदिराच्या समोरील पद्मावती मंदिरासमोर जेसीबीच्या सहाय्याने वाळू उपसा केला जात आहे. या वाळूचा साठा दर्लिंग मंदिरासमोरील माळरानावर करण्यात आला आहे. रात्रीच्यावेळी वाळू उपसा करून दिवसा वाळू विक्री केली जात आहे. यामुळे भीमा नदीमध्ये मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. तरी वरिष्ठ अधिकार्यांनी लक्ष घालून अवैध वाळू उपसा बंद करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. सध्या महसूल प्रशासनाकडून फिरते पथक नेमले असून, रात्रीच्यावेळी वाळूचोरी होत असल्याचे समजले आहे. विठ्ठल कारखान्याच्या निवडणुकीसंदर्भात कामकाज सुरू असून दोन दिवसामध्ये कारवाई करणार आहे.