भोसे, ता.पंढरपूर (दि.11) पंढरपूर तालुक्यातील शेतकर्यांचा श्री विठ्ठल साखर कारखाना हा राजवाडा असून तो अबाधित ठेवण्याचे काम आमदार श्री भारतनाना भालके यांनी प्रामाणिकपणे केले आहे. यापुढील काळात देखील त्यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याची प्रगती करण्यासाठी सभासदांना श्री विठ्ठल शेतकरी विकास पॅनलला प्रचंड मतांनी निवडून द्यावे असे आवाहन श्री विठ्ठल कारखान्याचे संचालक श्री राजुबापू पाटील यांनी भोसे (ता.पंढरपूर) येथील भव्य प्रचार सभेत केले. श्री विठ्ठल साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या निमित्ताने आयोजित प्रचार सभेत ते बोलत होते. सभेच्या अध्यक्षस्थानी कारखान्याचे अध्यक्ष आमदार श्री भारतनाना भालके होते.
यावेळी बोलतांना श्री पाटील म्हणाले की, श्री विठ्ठल कारखान्याच्या अध्यक्षपद घेतल्यापासून आमदार श्री भारत भालके यांनी तालुक्यातील प्रत्येक सभासदाला व कार्यकर्त्याला न्याय दिला आहे. कधी दुजाभावाची वागणूक दिली नाही की संस्थेचा कारभार करतांना राजकारण केले नाही. म्हणूनच गेल्या 14 वर्षाच्या काळात कारखान्याची चौङ्गेर अशी प्रगती झाली आहे. सभासदांच्या ऊसाचे वेळेत गाळप व्हावे यासाठी त्यांनी श्री विठ्ठल कारखान्याच्या विस्तारीकरणाचे काम पूर्ण केले. शिवाय, उपपदार्थ निर्मिती प्रकल्प पूर्ण केले. प्रकल्प उभारणीसाठी घेतलेल्या सर्व कर्जाची परतङ्गेड देखील केली आहे. कारखान्याची प्रगती होत असतांना काही विघ्नसंतोषी लोकांनी राजकीय हेतूने कारखान्याची निवडणूक लावली आहे. निवडणुकीमुळे कारखान्यावर हाकनाक सुमारे 60 लाख रूपयांचा भुर्दंड पडणार आहे.
यावेळी कारखान्याचे अध्यक्ष आमदार श्री भारतनाना भालके म्हणाले की, कारखान्याच्या स्थापनेमध्ये कै.औदुंबरआण्णा पाटील यांच्या बरोबरच श्री यशवंतभाऊ पाटील यांचेही योगदान मोठे आहे. त्यांनी सर्वसामान्य शेतकर्यांच्या ऊसाचे गाळप व्हावे, इतर कारखान्याकडे हेलपाटे मारावे लागू नयेत यासाठी त्यांनी श्री विठ्ठल कारखान्याच्या उभारणीत मोठे काम केले आहे. कै.औदुंबरआण्णा, कै.वसंतदादा काळे आणि श्री यशवंतभाऊ पाटील यांच्या आदर्श विचारांचा वारसा घेवून आम्ही श्री विठ्ठल परिवारातील नेते मंडळी शेतकर्यांसाठी धडपड करीत आहोत. साखर कारखानदारीकडे न पाहता तालुक्यातील सर्वसामान्य शेतकर्यांच्या इतर प्रश्नांकडे वेळोवेळी आम्ही लक्ष घातले आणि शेतीच्या पाण्यापासून ते रस्त्यापर्यंतच्या अनेक समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न केले आहेत. त्यातून अनेकांना न्याय देण्याची भूमिका पार पार पाडली.
यावेळी सहकार शिरोमणी वसंतराव काळे कारखान्याचे अध्यक्ष श्री कल्याणराव काळे, श्री विठ्ठल कारखान्याचे संचालक श्री मोहनआण्णा कोळेकर, श्री विठ्ठल सुतगिरणीचे अध्यक्ष श्री दिनकरबापू पाटील, बळीराजा शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष श्री नितीन बागल, जिल्हाध्यक्ष श्री माऊली हळणवर यांची भाषणे झाली.
सदर सभेस श्री विठ्ठल कारखान्याचे व्हा.चेअरमन श्री लक्ष्मणआबा पवार तसेच सर्वश्री विक्रमआबा कोळेकर, ज्ञानेश्वर गायकवाड, दशरथ खळगे, कांतिलाल भिंगारे, राजाराम भिंगारे, नंदकुमार पाटील, दिलीप पुरवत, भारत मुळे आदींसह शेतकरी सभासद व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.