
नागपूरचे प्रसिद्ध डेंटीस्ट डॉ मुकेश चांडक यांचा सेंटर पाँईट स्कूल पाईंट स्कूलमध्ये शिकणारा युगचे 1 सप्टेंबर 2014 रोजी अपहरण करण्यात आले होते. अपहरणकर्त्यानी आधी 10 कोटीनंतर 5 कोटी रुपये खंडणीची मागणी केली होती. अपहरणकर्त्यानी युगचा नागपूर जवळील पाटणसावंगी जवळील लोणखैरी येथील नाल्यात निर्घृण खून केला होता. या प्रकरणात डॉ.चांडक यांच्याकडील जुना कम्पाऊंडर राजेश दवारे आणि त्याला साथ देणारा अरविंद सिंग यांना अटक करण्यात आली.