
अग्निशमन दलाच्या वतीनं जेट कूल सोल्युशन या नव्या पद्धतीचा वापर करण्यात आला. अशा पद्धतीचा हा पहिलाच प्रयोग अग्निशमन दलाद्वारे करण्यात आला. कचऱ्यामध्ये खोलवर असलेली आग विझवण्यासाठी अधिक वेगाने पाण्याची फवारणी करण्यासाठी मिनी वॉटर टेण्डरचा वापर केला गेला.
घटनास्थळी 14 फायर इंजिन, पाण्याचे 8 टँकर्स, अग्निशमन विषयक अत्याधुनिक यंत्रसामुग्रीसह 21 अधिकारी आणि 132 जवान घटनास्थळी दाखल झाले आहेत.
आगीची तीव्रता मोठी नसली तरी हवेच्या गतीमुळे आग धुमसत असल्यानं वातावरणात प्रचंड धूर पसरला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून देवनार परिसरातील सर्व शाळा आणि कॉलेजना प्रशासनाने दोन दिवसांची सुट्टी जाहीर केली आहे.
धुरामुळे श्वसनाचा त्रास होऊ नये म्हणून डोळ्यांवर काळा चष्मा आणि तोंडावर ओला रुमाल ठेवावा असे आवाहन नागरिकांना करण्यात येत आहे.