मुंबई : ‘मेक इन इंडिया’ सप्ताहाच्या दुसऱ्या दिवशी आज बीकेसीत विज्ञानाबरोबरच कला-संस्कृतीचा संगम पाहायला मिळाला. बीकेसीत मांडण्यात आलेली अनेक वैशिष्टयपूर्ण यंत्रं आज सर्वांचं आकर्षण ठरली.

डान्सिंग जेसीबीसह अनेक यंत्र पाहण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती. त्याचसोबत विविध राज्यांच्या कलाकारांनी अनेक कार्यक्रम सादर करत लोकांचं मनोरंजन केलं.
दरम्यान, संध्याकाळी गिरगाव चौपाटीवर महाराष्ट्र रजनीचा कार्यक्रम होणार आहे. विदेशी पाहुण्यांसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे यांसारखे अनेक राजकीय नेते या कार्यक्रमाला हजर राहणार आहेत.
महत्त्वाचं म्हणजे अमिताभ बच्चन यांनी महाराष्ट्राबाबत लिहिलेली कविताही ते यावेळी सादर करतील.
आमीर, सलमानसह अनेक सेलिब्रिटी या कार्यक्रमाला हजेरी लावणार आहेत. शिवाय देशी-विदेशी पाहुण्यांच्या हजेरीत छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रतिकात्मक राज्यभिषेक सोहळाही यावेळी होणार आहे
.