कर्नल भोसले चौक शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन- सुरज भोसले

पंढरपूर । प्रतिनिधी,

सालाबादप्रमाणे शिवजन्मोत्सव सोहळ्या निमित्त चालू वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांच्या 386 व्या जयंतीनिमित्त नागेश भोसले मित्र मंडळाच्यावतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन केल्याचे या वर्षीच्या शिवजन्मोत्सव सोहळ्याचे अध्यक्ष व अखिल भारतीय युवक मराठा महासंघाचे अध्यक्ष सुरज भोसले यांनी सांगितले.

शुक्रवार दि.19 ङ्गेब्रुवारी 2016 रोजी छ.शिवाजी महाराजांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना राज्य परिवहन महामंडळाचे माजी अध्यक्ष सुधाकरपंत परिचारक यांच्या शुभहस्ते होणार आहे. तसेच त्याचदिवशी सकाळी 9.30
वा. भव्य रंगभरण व चित्रकला स्पर्धेचे उद्घाटन पुणे विभाग शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत सर यांच्या शुभहस्ते होणार आहे.

शनिवार दि.20 ङ्गेब्रुवारी 2016 रोजी सकाळी 9.30 वाजता रक्तदान शिबीराचे आयोजन केले आहे. त्या शिबीराचे उद्घाटन खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांचेहस्ते होणार आहे. त्याचप्रमाणे रविवार दि.21 ङ्गेब्रुवारी 2016 रोजी सायं.6 वा. रंगभरण व चित्रकला स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ व मराठवाडा विद्यापीठ औरंगाबादचे इतिहास अभ्यास व समीक्षक प्रा.डॉ.महेश खरात यांचे शिवरायांच्या मोठेपणाचे रहस्य या विषयावर व्याख्यान आयोजित केले आहे.

या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून पंढरपूर – मंगळवेढा मतदारसंघाचे आमदार भारतनाना भालके हे उपस्थित राहणार आहेत. तसेच सोमवार दि.22 ङ्गेब्रुवारी रोजी सायं.5.30 वा.छ. शिवाजी महाराजांच्या मूर्तीची भव्य मिरवणूक निघणार असून कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे युटोपियन शुगर कचरेवाडीचे चेअरमन उमेश परिचारक हे असतील. या मिरवणूकी मध्ये भव्यदिव्य घोडे, उंच, लेझीम पथक, शिवचरित्रांवर देखावे व पारंपारिक वाद्य व मर्दानी खेळ, कला सादर करणार आहेत. तरी या कार्यक्रमात मंडळातील हजारो कार्यकर्ते सामील होणार आहेत.

तरी कार्यक्रमांसाठी शहर व तालुक्यातील शिवप्रेमींनी उपस्थित रहावे, असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष सुरज भोसले यांनी केले. यावेळी मंडळाचे सचिव युवराज भोसले, रोहित भैय्या शिंदे, सागर साळुंखे, लक्ष्मी प्रसाद मोहिते सर, काशिनाथ गोगाव सर, विशाल जगताप, प्रशांत घोडके व मंडळाचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *