वारकऱ्यांना कोणतीही कमतरता भासता कामा नये… जगदगुरु तुकोबा व संत सोपानकाका पालखी सोहळा पुर्व तयारी आढावा बैठक..

वारकऱ्यांना कोणतीही कमतरता भासता कामा नये… जगदगुरु तुकोबा व संत सोपानकाका पालखी सोहळा पुर्व तयारी आढावा बैठक..

बारामती- बारामती तालुक्‍यात जगदगुरु तुकोबा व संत सोपानकाका पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांना नागरी सुविधांची कोणतीही कमतरता भासणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना प्रांताधिकारी हेमंत निकम यांनी दिल्या.
नवीन प्रशासकीय इमारतीत जगतगुरु तुकोबा व संत सोपानकाका पालखी सोहळा पूर्व तयारीसाठी आढावा बैठक प्रांताधिकारी हेमंत निकम यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी पालखी स्थळ मुक्काम गावचे सरपंच, सामाजिक संस्थेचे प्रतिनिधी, तहसीलदार हणुमंत पाटील, गटविकास अधिकारी प्रमोद काळे, नायब तहसीलदार रमेश पाटील, तालुका कृषी अधिकारी संतोषकुमार बरकडे, बांधकाम विभागाचे सहायक अभियंता विश्‍वास ओव्हळ, शहर पोलीस ठाण्याचे प्रतिनिधी उपस्थती होते.
हेमंत निकम यांनी वारकऱ्यांसाठी प्राधान्याने पाणी पुरवठा करण्यासाठी आवश्‍यक उपाययोजना व पर्यायी व्यवस्था करण्यासंदर्भात चर्चा केली. पालखी स्थळावर लाईट व्यवस्था नियोजनाची माहिती त्यांनी जाणून घेतली. वारकऱ्यांनसाठी शौचालये जास्तीत जास्त उपलब्ध करावी. बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना रस्त्याची दुरुस्ती व डागडुजी करण्याबाबत सूचना दिल्या. आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना पालखी मुक्कामी स्थळावर आरोग्यविषयक काळजी घेऊन डॉक्‍टरांची मुबलक उपलब्धता करुन देण्याच्या सूचना दिल्या. पोलीस यंत्रणेस काटेकोर सुरक्षाव्यवस्था करावी तसेच वाहतुकीचा नियोजन आराखडा सादर करण्यास सांगितले. पालखी मार्गस्थ झाल्यानंतर पालखी स्थळावरील स्वच्छता स्वयंसेवी संस्थाच्या मदतीने तसेच पंचायत समितीची यंत्रणा यांच्यामार्फत करण्याबाबत गावातील सरपंचांना मार्गदर्शन केले.
तहसीलदार हनुमंत पाटील यांनी अधिकाऱ्यांना समन्वयाच्या माध्यमातून आपआपसात संपर्क ठेवण्याच्या सूचना दिल्या. कोणीही गाफिल न राहता आपली जबाबदारी चोखपणे पार पाडण्यास सांगितले.
आपत्ती व्यवस्थापनासाठी सर्व यंत्रणांनी सज्ज राहावे
पुरनियंत्रण व आपत्ती व्यवस्थापनासाठी सर्व विभागांनी सज्ज राहावे. तसेच आपत्ती व्यवस्थापनासाठी फोन डायरी तयार करुन यामध्ये सर्वांचे संपर्क क्रमांक घ्यावीत. प्रत्येक विभागाने नियंत्रण कक्ष स्थापन करावा, आपत्कालिन परिस्थीतीचा मुकाबला करण्यासाठी कोणीही गाफील न राहता अलर्ट राहावे. तसेच नगरपालिकेने आपत्ती व्यवस्थापनाबाबत केलेल्या नियोजनाची माहितीही प्रांताधिकारी हेमंत निकम यांनी घेतली.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *