उस्मानाबाद, सोलापूर जिल्ह्यांत हलका पाऊस; चंद्रपूरमध्ये सर्वाधिक 46.5 अंश तापमानाची नोंद
10 May.2017
औरंगाबाद- राज्यात १० ते १३ मे या काळात पाऊस पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तवली आहे. मंगळवारी चंद्रपूर येथे सर्वाधिक ४६.५ अंश तापमानाची नोंद झाली. दरम्यान, उस्मानाबाद, सोलापूर, सांगली व नगर जिल्ह्यात मंगळवारी अवकाळी पाऊस झाला. त्यामुळे द्राक्ष, आंबा, केळी, डाळिंब पिकांचे नुकसान झाले.
स्कायमेटच्या अंदाजानुसार, राज्यात येत्या दोन -तीन दिवसांत वादळी वारे, विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. बीड, उस्मानाबाद, जालना, लातूर, हिंगोली, परभणीसह अमरावती, बुलडाणा, चंद्रपूर, नागपूर, सोलापूर, वर्धा, वाशीम आणि यवतमाळ या जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे.
राज्यातील प्रमुख शहरांचे तापमान
नगर ४१.९
जळगाव ४३.८
नाशिक ३९.३
औरंगाबाद ४१.८
सोलापूर ४१.८
परभणी ४४
अकोला ४४.२
बुलडाणा ४१.२
चंद्रपूर ४६.४
पुणे वेधशाळेचा अंदाज
१० मे : दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात तुरळक पावसाची शक्यता.
११-१२ मे : राज्यात संपूर्ण भागात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता.
१३ मे : मराठवाडा, दक्षिण-मध्य महाराष्ट्र, कोकणात तुरळक पावसाचा अंदाज.
१३ मे : विदर्भात काही भागांत उष्णतेची लाट येण्याची शक्यता.
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..
अल्पदरात!!
मुख्य संपादक-भगवान वानखेडे
संपर्क- 8308838111



