👁 2 Views

माफीच्या साक्षीदारालाही शिक्षा झाली पाहिजे

माफीच्या साक्षीदारालाही शिक्षा झाली पाहिजे

10 May. 2017

न्यायालयात मुख्य आरोपींची मागणी
पुणे – मी हा गुन्हा केला नाही. माफीचा साक्षीदार बनलेल्या राजेश चौधरी याने आणि त्याच्या दोन मित्रांनी हा गुन्हा केला आहे. चौधरी माझी गाडी घेऊन गेला होता. माझ्याबरोबर माफीचा साक्षीदार राजेश चौधरीला यालाही शिक्षा द्यावी. बायको, मुलगी आणि आई असे माझे कुटुंब आहे. याचा विचार करून मला द्या दाखवावी. कमीत कमी शिक्षा सुनवावी, असे या प्रकरणाचा मुख्य आरोपी असलेल्या योगेश राऊत याने न्यायालतात म्हणणे मांडले.
नयना पुजारी प्रकरणातील आरोपींना पोलिसांनी मंगळवारी सकाळी 11 वाजता न्यायालयात हजर केले. 11.15 वाजता खटल्याच्या कामकाजास सुरूवात झाली. न्यायालयाने तिघांना दोषी धरले आहे. शिक्षेवर काय बोलायचे आहे का, प्रथेप्रमाणे अशी विचारणा न्यायालयाने तिघांना केली. त्यावेळी आपण हा गुन्हा केला नसल्याचे मुख्य आरोपी योगेश राऊत याने सांगितले. तर महेश ठाकुर याने देईल ती शिक्षा मान्य असल्याचे सांगितले. विश्‍वास कदम याने न्यायालयात आरोपींना शिक्षा होत असल्याचे ऐकले होते. मात्र, ज्याच्या गुन्हाशी काहीही संबंध नाही, असानाही शिक्षा होत असल्याची प्रचिती आज येत आहे. माझा या गुन्ह्याशी काहीही संबंध नाही. पोलिसांनी मला या प्रकरणात गोवले आहे.
एक तास आधीच आरोपी न्यायालयात हजर
येरवडा जेल प्रशासनाने सोमवारी आरोपींना विलंबाने पोलिसांच्या ताब्यात दिले होते. त्यामुळे खटल्याच्या सुनावणीस विलंब झाला होता. त्यामुळे न्यायालयाने येरवडा प्रशासनाला नोटीस बजावली होती. या पार्श्‍वभूमीवर येरवडा प्रशासनाने मंगळवारी आरोपींना लवकर ताब्यात दिले. त्यामुळे सुनावणीच्या आधी एक तास म्हणजे 10 वाजताच आरोपींना पोलिसंनी न्यायालयात आणले होते.

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..
अल्पदरात!!
मुख्य संपादक-भगवान वानखेडे
संपर्क- 8308838111

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *