👁 10 Views

अभिनेत्री पूजा बेदीची मुलगी रूपेरी पडद्यावर झळकणार?

2011 मध्ये सोनी इंटरनॅशनल वाहिनीच्या एका रिअॅलिटी शोमध्ये आलिया झळकली आहे. या शोमध्ये ती आपल्या आईसोबत स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती. आलियाचे ग्लॅमरस फोटो पाहून तिला तिचे मित्रमंडळींनी अभिनयक्षेत्रात करिअर करण्याचा सल्लाही दिला आहे.

स्टार किडस म्हटले की रसिकांचे त्यांच्याकडे पाहाण्याचा दृष्टीकोणही बदलतो. स्टार किडस म्हटले तर त्यांची मुलेही सिनेमातच काम करणार हे काही नवीन नसल्यामुळे त्यांच्या आई-वडिलांमुळेच अभिनयक्षेत्रात काही ना काही कारणामुळे स्टार किडसची चर्चाही होतच असते.स्टार किडसविषयी रोज काही ना काही बातम्या कानावर पडत असतातच.मात्र सोशल मीडियामुळे या स्टारकिडसच्या आयुष्यातल्या सगळ्या घडामोडी कळणे शक्य होते. कारण, सोशल मीडियावर सतत त्यांच्या अपडेट ते स्वतःअपडेट करत असतात.त्यामुळे त्यांच्याविषयीच्या घडामोडी त्यांच्या चाहत्यांपासूनही जास्त दिवस लपून राहात नाही. सध्या अशीच एक स्टार किडस सोशल मीडियावर धुमाकुळ घालत असल्याचे पाहायला मिळतंय.  पूजा बेदीची मुलगी आलिया बेदीचे फोटो सोशल मीडियावर खूप हिट ठरत असल्याचे पाहायला मिळत आहे. फोटोत आलियाचा हॉट अंदाज पाहून तिला खूप सा-या चांगल्या प्रतिक्रीया मिळाल्याचे पाहायाला मिळतंय. 2011 मध्ये सोनी इंटरनॅशनल वाहिनीच्या एका रिअॅलिटी शोमध्ये आलिया झळकली आहे. या शोमध्ये ती आपल्या आईसोबत स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती.आलियाचे ग्लॅमरस फोटो पाहून तिला तिचे मित्रमंडळींनी अभिनयक्षेत्रात करिअर करण्याचा सल्लाही दिला आहे. आलिया फॅशन इंडस्ट्रीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण करत असून बॉलिवूडचेही तिला वेध लागले असल्याचे बोलले जात आहे. आलिया नेहमीच तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर स्वतःचे ग्लॅमरस फोटोज शेअर करत असते.पूजाने 1994 मध्ये गुएट्टा इब्राहिम फर्नीचरवालासोबत लग्न केले होते. या दोघांना  उमर इब्राहिम हे मुलाचे तर आलिया इब्राहिम हे त्यांच्या मुलीचे नाव आहे. लग्नाच्या आठ वर्षांनी पूजाने पतीपासून घटस्फोट घेतला.2003 मध्ये दोघांनी कायदेशीररित्या घटस्फोट घेतला होता.पूजा बेदीने जो जीता वही सिकंदर,लुटेरा,विषकन्या,आतंक ही आतंक,फिर तेरी कहानी याद आई या सिनेमांसह काही टीव्ही शोसाठी होस्ट म्हणूनही झळकली होती. 

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..
अल्पदरात!!
मुख्य संपादक-भगवान वानखेडे
संपर्क- 8308838111

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *