👁 17 Views

निगडीतील अपघातात तरुणाचा मृत्यू

पिंपरी, (वार्ताहर) – दुचाकीवरुन जाणाऱ्या तरुणाला टेम्पोमधील लोखंडी प्लेट लागल्याने गंभीर जखमी झाला. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. 24 एप्रिलला तळवडे येथील ज्योतीबा मंगल कार्यालयजवळ दुपारी हा प्रकार घडला. तसेच, अन्य एकजण गंभीर जखमी झाला आहे.
किशोर विश्वनाथ भगनडे (वय-28, रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. राजीव दत्ता (रा. साईनाथनगर, निगडी) गंभीर जखमी झाला आहे. टेम्पो चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
किशोर आणि राजीव दोघेजण दुचाकीवरुन तळवडे निगडी रोडने जात होते. त्यावेळी पुढे जाणाऱ्या टेम्पोचा फाळका उघडा राहिल्याने टेम्पोमधील लोखंडी प्लेटा बाहेर आल्या. त्याचा धक्का लागल्याने किशोर गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, उपचार सुरु असताना त्याचा मृत्यू झाला. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..
अल्पदरात!!
मुख्य संपादक-भगवान वानखेडे
संपर्क- 8308838111

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *