👁 11 Views

आता एका क्‍लिकवर पॅनसोबत आधार कार्ड लिंक करा!

नवी दिल्ली : आधार कार्डशी पॅन लिंक करणे आता आणखी सोपे झाले आहे. कारण आयकर विभागाने यासाठी ई-फायलिंग ही नवी ऑनलाईन सुविधा सुरु केली आहे. याव्दारे एका स्टेपमध्ये तुमचे आधार कार्ड पॅनसोबत लिंक करता येणार आहे. सरकारने इनकम रिटर्न भरण्यासाठी पॅनसोबतच आधार कार्डही अनिवार्य केले आहे. त्यामुळे करदात्यांना आधार कार्ड पॅनशी लिंक करण्यासाठी अडचण येऊ नये म्हणून आयकर विभागाने आपल्या वेबसाईटवर ही नवी सुविधा उपलब्ध करुन दिली आहे.

आधार कार्ड पॅनसोबत कसे लिंक कराल?
आयकर विभागाच्या incometaxindiaefiling.gov.in या वेबसाईटवर ई-फायलिंग ही नवीन सुविधा देण्यात आली आहे. या लिंकवर क्‍लिक केल्यानंतर अगोदर तुमचा पॅन क्रमांक टाकावा लागेल. त्यानंतर आधार नंबर लागेल आणि त्याखालीच आधार नंबरवर असलेले नाव टाकावे लागेल. वरील सर्व माहिती अचूक टाकल्यानंतर खाली दिलेला व्हेरिफिकेशन कोड टाकून लिंक आधार या पर्यायावर क्‍लिक करावे लागेल. यानंतर लगेच तुमचे आधार कार्ड पॅनशी लिंक होईल. दरम्यान आधार कार्ड आणि पॅनवर असणारी जन्म तारीख एक असणं गरजेचं आहे. अन्यथा तुम्हाला आधार कार्डशी संलग्नित मोबाईल क्रमांकावर वन टाईम पासवर्ड येईल. तो पासवर्ड टाकून पुढील प्रक्रिया करावी लागेल.

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..
अल्पदरात!!
मुख्य संपादक-भगवान वानखेडे
संपर्क- 8308838111

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *