👁 14 Views

जस्टिन बिबर गाणं म्हणत नव्हता…तर..

नवी मुंबई : भारतात पॉप गायक जस्टिन बिबरची पहिली कॉन्सर्ट झाली, पण यावेळी प्रेक्षक मोठ्या प्रमाणात नाराज झाले. कारण बीबर फक्त रेकॉर्डेड गाण्याच्या सुरात सूर मिळवत होता. फक्त ओठ हलवत होता.
एका आयोजकाने सांगितलं की, बीबर आपल्या आशियाच्या पहिल्या टूरला आला आहे, तो भारतातून परतला आहे असं मानलं जात आहे, पण असं म्हटलं जात आहे की, २३ वर्षीय बीबर दिल्ली, जयपूर आणि आग्रालाही जाणार आहे.
पुण्याहून कॉन्सर्टसाठी ३ लाख ६ हजार रूपयांचा प्रति पास खर्च करून आलेल्या एका कुटुंबाने सांगितलं की, बिबरच्या या कार्यक्रमाची मजा गेली. पतीने सांगितलं की, हे स्पष्ट दिसत होतं की, बिबर गाणं म्हणत नव्हता.
सोशल मीडियावर कन्नडाची गायकही वैतागली आहे. जवळ-जवळ दीड तास बिबर स्टेजवर होता, आणि त्यांच्या आजूबाजूला हजारो प्रशंसक होते, यात ब़ॉलीवूड सेलिब्रिटी आणि त्यांच्या मुलांचाही समावेश होता.

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..
अल्पदरात!!
मुख्य संपादक-भगवान वानखेडे
संपर्क- 8308838111

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *