👁 11 Views

इंदापुरात वीज खंडित प्रकरणी मशाल मोर्चा

इंदापूर: इंदापूर शहरातील वीज खंडित असल्याच्या कारणावरून इंदापूर नगरपालिकेच्या सत्ताधारी कॉंग्रेस पक्षाचा निषेध करित शनिवारी (दि. 6) शहरातून परवानगी न घेता मशाल मोर्चा काढून सभा घेतल्या प्रकरणी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांवर इंदापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस प्रदीप गारटकर यांच्यासह तीन नगरसेवक आणि शहराध्यक्षांसह कार्यकर्त्यांचा समावेश आहे.
वीज बिल थकबाकीमुळे 1 मे रोजी इंदापूर शहराचा वीज पुरवठा वितरण कंपनीने खंडित केला. पाच दिवस उलटूनही विजेच्या प्रश्न सत्ताधाऱ्यांनी सोडविला नसल्याच्या निषेधार्थ इंदापूर शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने शहरातून शनिवारी (दि. 6) रात्री पावणेआठ वाजण्याच्या सुमारास संभाजी चौकापासून मशाल मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा नेहरू चौकमार्गे मेन रोड, शिवाजी चौक, जुना हायवे रोडने इंदापूर नगरपालिकेच्या प्रांगणापर्यंत काढण्यात आला. पुणे जिल्हा अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार पूर्व परवानगी शिवाय मशाल मोर्चा काढून घोषणाबाजी केली. या मोर्चाला पोलीस प्रशासनाकडून परवानगी काढली नव्हती. हा मोर्चा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष अनिल राऊत यांच्या नेतृत्वाखाली निघाला होता. मोर्चानंतर नगरपालिकेच्या प्रांगणात सभा झाली. सभेला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस प्रदीप गारटकर हेही उपस्थित होते.
यावेळी बाळा ढवळे, नगरसेवक स्वप्निल राऊत, अनिकेत वाघ, गजानन गवळी, अशोक मखरे, राकेश गानबोटे, अरबाज शेख, इम्रान शेख, आबा शिंदे आणि इतर रात्री पावणेआठच्या दरम्यान बेकायदा गर्दी जमवून बिगरपरवाना संभाजी चौक ते इंदापूर नगरपरिषदेपर्यंत मशाल मोर्चा काढून सभा घेतली म्हणून मुंबई पोलीस कायदा कलम 37(1)(3)चा आदेशाचा भंग केला म्हणून वरील इसमांविरुध्द इंदापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाली आहे.

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..
अल्पदरात!!
मुख्य संपादक-भगवान वानखेडे
संपर्क- 8308838111

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *