👁 15 Views

नमस्ते म्हणत जस्टिनने जिंकली भारतीयांची मने!

नवी मुंबई

पॉपस्टार जस्टिन बीबरने आज भारतीयांची मने जिंकली. नवी मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडियमवर त्याच्या दमदार लाइव्ह परफॉर्मन्सने सगळ्यांनाच घायाळ करून टाकलं. रात्री सव्वाआठच्या सुमारास जस्टिनची स्टेजवर एंट्री झाली आणि स्टेडियमवर जमलेल्या सुमारे ५० हजार चाहत्यांनी एकच कल्ला केला. जस्टिनने एकामागून एक ‘हॉट’ गाण्यांची बरसात करत चाहत्यांना खूष करून टाकलं. विशेष म्हणजे ‘नमस्ते’ म्हणत जस्टिनने स्टेजवरून निरोप घेतला.

जस्टिनच्या कॉन्सर्टसाठी आज सगळेच रस्ते जणू नवी मुंबईच्या दिशेने चालले होते. यात तरुणाईचा उत्साह तर पाहण्याजोगा होता. दुपारपासूनच स्टेडियमबाहेर रांगा लागल्या होत्या. विशेष म्हणजे अक्षय कुमार, श्रीदेवी, आलिया भट्ट, सोनाली बेंद्रे, रवीना टंडन यासह अनेक बॉलिवूड स्टार्सही जस्टिनच्या कॉन्सर्टचा जलवा अनुभवण्यासाठी पोहोचले होते. बिपाशा बसू आणि तिचा पती करण सिंह ग्रोव्हर या कार्यक्रमाला आले होते मात्र पाच मिनिटांतच ते निघून गेले. सोबत बॉडीगार्ड नसल्याने तसेच गर्दी खूप असल्याने आम्ही निघत आहोत, असे बिपाशाने सांगितले.

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..
अल्पदरात!!
मुख्य संपादक-भगवान वानखेडे
संपर्क- 8308838111

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *