Pandharpur Live
पंढरपुर शहरातील गोविंदपुर,डोळे वाडा खिस्ते गल्ली येथे सवनुर नावाच्या डॉक्टर ने वैद्यकिय सेवेचा अवैधरित्या आपला व्यवसाय सुरु केला आहे. त्याच बरोबर जुन्या कोर्टासमोर, मटन मार्केट जवळ पंढरपुर येथील बिल्बकुमार या नावाच्या डॉक्टर ने आपला अवैधरित्या व्यवसाय सुरु केला आहे. हे दोन्ही डॉक्टर बर्याच वर्षा पासून आपला व्यवसाय करित आहे. हे बोगस डॉक्टर आहेत का? हे पडताळुन पाहण्यासाठी त्यांच्याकडे पेशंट पाठवून चौकशी केली आसता महाराष्ट्र कौन्सील ऑफ इंडियन मेडीसीन यांची मान्यता त्यांच्याकडे नाही. कोणतेही सर्टीफिकेट नसून सुद्धा ते डॉक्टर की हां व्यवासाय करत आसून त्यांनी आजपर्यंत केलेले अवैधरित्या राजरोजपणे वैधकिय व्यवसाय करून अनेक लोकांना लुटले आहे. त्याच्या कडून उपचार करून घेणार्या भोळ्या भाबड्या जनतेची आर्थिक लुट तर होतच आहे. परंतु भोघस डॉक्टर आसल्याने चुकीचे उपचार झाल्यास उपचार घेणार्या रुग्नांच्या जिवितास धोका निर्माण होउ शकतो. आसे निवेदन महर्षी वाल्मिकी संघ शहराध्यक्ष पंढरपुर मा. निलेश माने यांनी या जिल्हाधिकारी साहेब, प्रांतअधिकारी साहेब, व मुख्याधिकारी साहेब यांना देण्यात आली आहे तरी या गंभीर बाबी कडे तत्परतेने लक्ष देऊन हे बोगस डॉक्टर आहेत का? हे पडताळून पाहून यांच्या वर योग्य ती कारवाई करावी आशी निवेदना द्वारे शहराध्यक्ष मा.निलेश माने यांनी मागणी केली आहे. अन्यथा महर्षी वाल्मिकी संघाकडून तीव्र आंदोलन करण्यात येईल. निवेदन देते वेळी शहराध्यक्ष निलेश माने, सूरज कांबळे, संजय पगारे, आर्जुन देवकुळे,रामभाऊ कोळी, उपस्थित होते..
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..
अल्पदरात!!
मुख्य संपादक-भगवान वानखेडे
संपर्क- 8308838111



