मामाचे गाव राहिले दूर; डिजीटल जमान्याचा वाढता पगडा
– झुकझुक झुकझुक आगीनगाडी, धुरांच्या रेषा हवेत काढी, पळती झाडे पाहूया मामाच्या गावाला जावुया…, हे बालगीत ऐकलं की आठवण होते ती लहानपणातील सोनेरी दिवसांची. शाळांना सुट्या लागल्या की, चिमुरड्यांना ओढ लागते ती मामाच्या गावी जावून मौज-मजा आणि विविध खेळ खेळण्याची. मात्र, डिजीटल जमान्यत मामाचे गाव दूर राहिले असून पारंपरिक खेळांचा लहान मुला-मुलींना विसर पडल्याचे चित्र ग्रामीण भागातही दिसत आहे.
ग्रामीण भागात काही वर्षांपूर्वी कुरुघोडी, चंपुल, लंगडी, चिपरी, लगोरी, खडे उचलणे, विटी दांडू, कंचे, खुपसनी, लपंडाव, उडानटप्पु, आंधळी कोशिंबीर, सूर-पारंब्या असे खेळ ठिकठिकाणी खेळले जायचे. मात्र, हे पारंपरिक खेळ आता डिजीटल युगात हरवले आहेत. प्रकृतीसाठी व स्वास्थ्य राखण्यासाठी या खेळांमधून शरीराला पुरेसा व्यायाम मिळायचा. याउलट आता हे खेळ दुर्मिळ होऊन याची जागा मोबाईल, टीव्ही, संगणक यास सोशल मिडियाच्या साधनांनी घेतली आहे. पूर्वी उन्हाळ्यात शाळांना सुट्ट्या लागल्या की, मुलांच्या चेहऱ्यावर वेगळाच जल्लोष असायचा. सध्या, या खेळांबाबत लहान मुले अनभिज्ञ आहेत. वर्षानुवर्षे चालत आलेल्या या खेळांविषयी मुलांना ज्ञान अवगत व्हावे म्हणून अनेक शाळा, शैक्षणिक संस्थामधून आपल्या विद्यार्थ्यांना या खेळाविषयी माहिती सांगण्यात येत आहे. सोशल मिडियाच्या अनेक अकाउंट व ग्रुपवरून खेळाविषयीचे नियम, अटी, चित्रे प्रसारीत करण्यात येत आहेत. लहानपणी या खेळांची मजा घेतलेल्या तरुणांना आज मात्र कुतुहल वाटत आहे. शालेय जीवनात अनुभवलेले खेळ सध्या मोठमोठ्या खासगी शाळा-इमारती आदींच्या भिंतीवर रेखाटलेले आहेत.एकीकडे मानवी जीवनाची वाटचाल डिजिटल दुनियेच्या माध्यमातून प्रगतीपथावर असताना मानवाची शारीरिक कष्ट करण्याची क्षमता कमी होत आहे, त्यामुळे त्याच्या आयुष्याची वयोमर्यादाही दिवसेंदिवस खालावत चालली आहे, असे असले तरी डिजिटल युगात आपली प्रगती साधत असताना निसर्गाने घालून दिलेल्या
नियमांचे पालन करणेही गरजेचे आहे. आता… मामांनी आपल्या भाच्यांचे प्रबोधन करण्याची हीच वेळ आहे.
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..
अल्पदरात!!
मुख्य संपादक-भगवान वानखेडे
संपर्क- 8308838111




