पंढरपूर Live १२ मे
बिस्किटाचे आमिष दाखवून एका नराधमाने एका सहा वर्षाच्या मुलीवर बलात्कार केल्याची संतापजनक घटना पंढरीत घडली आहे.
पंढरपूर शहर पोलिसांकडून समजलेल्या माहितीनुसार
दि.१२ मे २०१७ रोजी दु.३:४५ वाजणेच्या सुमारास आरोपी प्रितम बाहुबली कांचनकोटी, रा.संतपेठ, पंढरपूर याने या मुलीला बिस्कीट खाणेसाठी १० रुपये देण्याचे आमिष दाखवून तिला गजानन महाराज मठाच्या मागील बाजूस असलेल्या पार्किगमधील एका खोलीत नेऊन तिचेवर बलात्कार केला.
हा प्रकार मुलीचे आईचे लक्षात आल्यावर या मातेने तात्काळ महिला सुरक्षा समितीच्या सौ.साधना राऊत यांचेकडे धाव घेतली. यानंतर शहर पोलीस ठाणेत सदर आरोपीविरूध्द बाललैंगीक अत्याचार संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल केला असुन आरोपीस पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अधिक तपास सपोनि कुलकर्णी करत आहेत.
या घटनेची सर्वत्र निंदा होत असुन आरोपीला कठोर शिक्षा होणेची मागणी होत आहे.
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..
अल्पदरात!!
मुख्य संपादक-भगवान वानखेडे
संपर्क- 8308838111




