पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरूपदासाठी अंतिम पाच नावांची चर्चा होत आहे. पुणे विद्यापीठाच्या भूषण पटवर्धन, अंजली क्षीरसागर, नितीन करमळकर, मुंबईच्या सुहास पेढणेकर आणि प्रा. ए. बी. पंडित यांची नावे अंतिम पाचमध्ये असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
पुणे विद्यापीठाच्या कुलगुरूपदांसाठी पुण्यात दोन दिवसांत मुलाखतीची प्रक्रिया पूर्ण झाली. त्यानंतर शोध समितीकडून एकूण 30 उमेदवारांमधून पाच जणांच्या नावांची यादी राज्यपालांकडे सुपूर्द केली जाते. या पाच जणांच्या यादीत कुणाचे नाव आहे, याचीच चर्चा शिक्षण क्षेत्रात रंगत आहे. पुणे विद्यापीठातील एकाची निवड कुलगुरू म्हणून होईल, महिला उमेदवारांना संधी मिळेल वा अन्य व्यक्तीची निवड होणार असेच तर्कवितर्क मांडले जात आहे.
दरम्यान, पुणे विद्यापीठाच्या आरोग्यशास्त्र विभागाचे डॉ. भूषण पटवर्धन, भौतिकशास्त्र विभागप्रमुख डॉ. अंजली क्षीरसागर, पर्यावरण विभागप्रमुख डॉ. नितीन करमळकर, रुईया कॉलेजचे प्राचार्य डॉ. सुहास पेढणेकर आणि प्रा. ए. बी. पंडित यांची नावे निश्चित झाल्याची माहिती सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. या पाच जणांतून कोणाची निवड होणार आहे, याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे.
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..
अल्पदरात!!
मुख्य संपादक-भगवान वानखेडे
संपर्क- 8308838111




