आईचा स्पर्श म्हणजे जादूच. ती पोटाला स्पर्श करते तेव्हा हा आईचा हात आहे, हे गर्भातील मूलही ओळखते. सर्वात वयोवृद्ध व्यक्तीलाही आईची गरज असते. आई शक्ती होऊन आयुष्यभर सोबत असते. ती अशी…
आई नव्हती तेव्हा मी घाबरत होतो
मी देवाला विचारले होते : मी नाजूक आहे. कसा जगू शकेन?
देवाने म्हटले होते : आई असेल. ती तुझ्यापेक्षाही नाजूक, पण तुझ्या संरक्षणास त्यापेक्षा भक्कम दुसरे नाही.
मी विचारले होते : मला भाषा येत नाही. तिचे म्हणणे कसे समजेल?
देव म्हणाला होता : तेथे आई असेल, तू ऐकलेही नसशील असे सुंदर, गोड शब्द उच्चारेल. ती तुला शिकवेन.
मी विचारले होते : पण तेथे तू नसशील. मी तुला कसे पाहू शकेन?
देव म्हणाला होता : तेथे आई असेन. माझी कमतरता नसेल. तू माझ्यापेक्षा जास्त सुरक्षित तेथे राहशील.
त्यावरून समजते की आई अशीच असते
मुलगा शाळेतून आला. शिक्षकांचे पत्र आईकडे दिले. पत्र उघडताच आईला धक्का बसला. त्यात लिहिले होते-‘तुमच्या मुलाकडे अलौकिक बुद्धिमत्ता आहे. त्याला शिकवू शकतील असे शिक्षक आमच्याकडे नाहीत…. त्याला तुम्हीच शिकवू शकता.’ २० वर्षांनंतर यश त्या मुलाच्या पायाशी लोळण घेत होते. आईच्या मृत्यूनंतर प्रथमच तो आईच्या खोलीत गेला. कपाटात तेच पत्र होते. त्यात लिहिले होते-तुमचा मुलगा मूर्ख आहे. आम्ही त्याला शिकवू शकत नाही.
पुढील स्लाइडवर वाचा….
लहान होतो तेव्हा दर ४ मिनिटांनी आपल्याला हवा होता आईचा स्पर्श
आता आपण मोठे झालो,
मग आईला किती मिनिटे देतो?
आईचे हे सर्वात शक्तिशाली छायाचित्र पाहून जगभरातील लोक उद्गारले,‘आमचे डोळे पाणावले आहेत.’लोकांना वाटले होते की, मुलीला आई नाही. तिने खडूने आईचे चित्र रेखाटले आणि तिच्या कुशीत झोपली. मात्र, छायाचित्र काढणारे इराकी छायाचित्रकार भरेश बिशेह यांनी सांगितले की, तसे काही नाही. माझ्याकडे आई आहे, हे मी छायाचित्रातून सांगत आहे. छायाचित्रात आईची ताकद दर्शवली आहे.
लहान होतो तेव्हा दर ४ मिनिटांनी आपल्याला हवा होता आईचा स्पर्श
जन्मापासून शाळेत जाण्यापर्यंतच्या वयात मुलांना सरासरी दर चार मिनिटांनी आईचे लक्ष आपल्याकडे असावे, असे वाटते. मॅकालेस्टर महाविद्यालय आणि कॅलिफोर्निया विद्यापीठाने संशोधनात म्हटले आहे की, पहिल्या वर्षी आईने मुलाला जास्त वेळ दिला तर मुले जास्त समजदार, हुशार होतात.
आता आपण मोठे झालो, मग आईला किती मिनिटे देतो?
आई आपली जबाबदारी पार पाडते, पण मोठे झाल्यानंतर आपण स्वत: तिच्यासाठी काही करतो का? तिला किती वेळ देतो? अमेरिकेच्या प्रिन्स्टन विद्यापीठाने एका संशोधनात म्हटले की, मुले आईला दररोज सरासरी ११ मिनिटेच देतात. मुली त्यापेक्षा जास्त म्हणजे दुप्पट वेळ देतात. अशाच एका अभ्यासात म्हटले आहे की, आपण लहान असतो तेव्हा आई एवढी व्यग्र असते की ती स्वत:च्या कामांसाठी फक्त १७ मिनिटेच देते.



