👁 12 Views

चालकाच्या चतुराईने मोठा अपघात टळला…

उन्हळ्यात डांबरी रस्त्यावर वाहनाचे टायर फुटण्याच्या घटना सतत घडत असतात. आता विदर्भाचे तापमान ४६.२ इतके आहे. अश्यात जर गॅस सिलेंडरने भरलेल्या चालत्या ट्रकच्या टायरला आग लागली तर काय होईल याची कल्पना देखील केल्या जात नाही.अशीच एक घटना गोंदिया जिल्ह्यात आज घडली. गोंदियाच्या  तिरोडा तालुक्या जवळील बिर्सी फाट्या जवळ गोंदियाकडे येत असलेल्या एचपी गॅसच्या सिलेनडर भरलेल्या ट्रकच्या मागच्या टायरला अचानक आग लागली. ही बाब ट्रक चालकाच्या लक्षात येताच प्रसंगवधान दाखवत  ट्रक चालकाने ट्रक थांबवून गावकऱ्यांच्या मदतीने अग्निशमनदलाला फोन करून तात्काळ बोलवले. ट्रक चालकाच्या हुशारीने एक मोठा अपघात टळला.

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..
अल्पदरात!!
मुख्य संपादक-भगवान वानखेडे
संपर्क- 8308838111

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *