👁 11 Views

सर्वसामान्यांसाठी खूशखबर; पेट्रोल, डिझेल स्वस्त आज मध्यरात्रीपासून नवे दर लागू

सर्वसामान्यांना पेट्रोलियम कंपन्यांनी सोमवारी मोठा दिलासा दिला आहे. पेट्रोलचे दर प्रतीलिटर २.१६ रुपयांनी तर डिझेलचे दर प्रतीलिटर २.१० रुपयांनी स्वस्त झाले आहे. आज मध्यरात्रीपासून नवे दर लागू होणार आहेत.
आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्चा तेलाच्या किंमतीमध्ये घट झाल्याने त्याचे पडसाद भारतातही उमटले. सोमवारी पेट्रोलियम कंपन्यांनी सोमवारी रात्री पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात करण्याची घोषणा केली. या महिनाभरात पेट्रोलियम कंपन्यांनी दुसऱ्यांदा पेट्रोल-डिझेलच्या दरात कपात केली आहे. यापूर्वी १ मेरोजी पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात किरकोळ कपात केली होती.

भारतातील पेट्रोलियम कंपन्या दर १५ दिवसांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरांचा आढावा घेतात. पण आता कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलचे दर दररोज बदलण्याचा निर्णय घेतला आहे. देशातील ५ शहरांमध्ये हा प्रयोग प्रायोगिक तत्त्वावर राबवला जाणार आहे. त्याच्या यशस्वीतेनंतर पुढील निर्णय घेण्यात येणार आहे. या पाच शहरांमध्ये पाँडेचरी, विशाखापट्टणम (आंध्र प्रदेश), उदयपूर (राजस्थान), जमशेदपूर (झारखंड) आणि चंदीगढ यांचा समावेश आहे.

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..
अल्पदरात!!
मुख्य संपादक-भगवान वानखेडे
संपर्क- 8308838111

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *