जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांची सदिच्छा भेट घेऊन सत्कार करताना जि.प. सदस्या शैला गोडसे, जकरायाचे अध्यक्ष बी. बी. जाधव, बसवराज पुजारी आदी.
पंढरपूर : सोलापूर जिल्ह्यातील रस्ते, पाणी, वीज, आरोग्य आदी विविध प्रश्न गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबीत आहेत. त्यासाठी भरीव निधी मिळत असला तरी प्रशासकीय कामाअभावी अनेक विकास कामे रखडली जातात. या सर्व कामांना प्रशासकीय मान्यता वेळेत देऊन ग्रामीण विकासाला प्राधान्य द्यावे, अशी मागणी भीमा बचाव पाणी संघर्ष समितीच्या अध्यक्षा, जि.प. सदस्या शैला गोडसे यांनी जिल्हाधिकाºयांकडे केली आहे.
सोलापूर येथील जिल्हाधिकारी कार्यालयात नुतन जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांची जि.प. सदस्या शैला गोडसे यांच्या शिष्ठ मंडळाने सदिच्छा भेट घेतली व सोलापूर जिल्ह्यातील रस्ते, पाणी, वीज, आरोग्य व शेतीच्या विविध प्रश्नांविषयी सविस्तर चर्चा केली. यामध्ये अनेक कामांना निधी उपलब्ध असतो. मात्र प्रशासकीय मंजूºया मिळत नाहीत. प्रशासकीय मंजुºया मिळूनही काही योजना निधीअभावी वर्षानुवर्षे अपूर्ण राहतात व वीज पुरवठा नदी काठच्या गावांमध्ये पिण्याच्या व शेतीच्या पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. याबाबत जिल्हाधिकाºयांनी लक्ष घालून तोडगा काढावा व शेतकºयांचे प्रश्न सोडवावेत, अशी मागणी शैला गोडसे यांनी केली.
यावर जिल्हाधिकाºयांनी सकारात्मकता दर्शवत ग्रामीण प्रश्नांचा आपले प्रथम प्राधान्य राहील, असे आश्वासन जि.प. सदस्य शैला गोडसे यांना दिले. यावेळी भीमा वापर संघर्ष समितीचे सचिव भारत आतकरे, जकराया शुगरचे अध्यक्ष अॅड. बी. बी. जाधव, बळीराजाचे अध्यक्ष दामोदर देशमुख, डॉ. बाळासाहेब सरवळे, जि.प. सदस्य नितीन नकाते, मिरीचे उपसरपंच बसवराज पुजारी, सुनिल डोके, जगदीश पाटील, विनोद कदम, येणकीचे सरपंच हरिभाऊ घुले, शेखर चांडोले, दयानंद सोनगे यांच्यासह जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कुरूलमध्ये आढावा बैठकीचे निमंत्रण
कुरूल जि.प. गटात गेल्या अनेक वर्षापासून रस्ते, पाणी, वीज, आरोग्य, शिक्षण आदी प्रश्न प्रलंबीत आहेत. त्याची त्वरीत सोडवणूक व्हावी, त्यासाठी त्या जि.प. गटात जिल्हाधिकाºयांच्या मार्गदर्शनाखाली जि.प.चे पदाधिकारी व स्थानिक शासकीय अधिकाºयांच्या बैठकीचे आपण लवकरच आयोजन करणार आहोत. त्याचे निमंत्रणही जिल्हाधिकाºयांना आत्ताच जि.प. सदस्या शैला गोडसे यांनी दिले आहे. त्यामुळे भविष्यात कुरूल जि.प. गटाचे विविध प्रश्न लवकर मार्गी लागतील, अशी अशा नागरिकांना वाटू लागली आहे.
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..
अल्पदरात!!
मुख्य संपादक-भगवान वानखेडे
संपर्क- 8308838111




