नाशिकरोड येथील गवळी समाजातील चार वर्षीय बालीकेवर सुभाष झंवर या नराधमाने अमानुष अत्याचार केला आहे.या घटनेचा निषेध करण्यासाठी व सदर गुन्ह्यातील आरोपीस जलदगती न्यायालयात खटला चालवून फाशीची शिक्षा व्हावी या मागणीसाठी पंढरपूर शहर व तालुका गवळी समाजाच्या वतीने बुधवारी पंढरीत मुकमोर्चाद्वारे तहसिलदार यांना निवेदन देण्यात येणार आहे.
सदर मोर्चाची सुरुवात सकाळी ठिक 10 वाजता भजनदास चौक येथील गवळी समाज मठापासून होणार असून महाद्वार,कालीकादेवी चौक,शिवाजी चौक,स्टेशन रोड मार्गे तहसिल कार्यालय येथे जावून निवेदन दिले जणार आहे.तरी या मोर्चात सर्व नागरिकांनी व विविध सामाजिक संघटनांनी सहभागी व्हावे असे आवाहन गवळी समाजाच्या वतीने करण्यात आले आहे.
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..
अल्पदरात!!
मुख्य संपादक-भगवान वानखेडे
संपर्क- 8308838111



