फूल कोमेजले की काय?
गेल्यावर्षी फेसबुकने लाईकबरोबर रिअॅक्शन बटण देखील आणले होते. त्यामुळे एखाद्या पोस्टवर आपल्याला राग, आनंद, प्रेम यासारख्या भावना इमोजीद्वारे व्यक्त करता येतात. पण गेल्या दोन तीन दिवसांत स्मायलीबरोबर इथे जांभळ्या रंगाचं एक फुलंही दिसू लागलं. तेव्हा नवीन काहीतरी मिळालं या विचाराने किती सुखावलो होतो ना आपण! एवढी फूलं देवाच्याही चरणीही वाहिली नसतील तेवढी प्रत्येकाच्या पोस्टवर वाहत होतो. आता हा झाला थोडा विनोदाचा भाग. पण फेसबुकवरचं हे नवं रिअॅक्शन बटण सगळ्यांनाच खूप आवडलं होतं.
एखाद्या पोस्टवर आभार मानायचे असतील तर त्यासाठी या जांभळ्या फुलाचा पर्याय दिला होता. पण अचानक हे फूल दिसेनासे झाल्यावर मात्र अनेक जण संभ्रमात पडले. ‘फेसबुकवरची ही फूलं कोमेजली म्हणून झुक्याने ती काढून टाकली की काय?’ असे विनोदही ऐकायला मिळाले. पण अनेकांना कदाचित माहिती नसेल की फुलाचे हे रिअॅक्शन बटण खास ‘मदर्स डे’निमित्त लाँच करण्यात आले. आईचे आभार मानण्यासाठी फेसबुकने युजर्सना मदर्स डेची ही खास भेट दिली होती. तेव्हा हे रिअॅक्शन बटण फक्त ‘मदर्स डे’पुरता होतं. ते झाल्यानंतर हे रिअॅक्शन बटण काढण्यात आले.
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..
अल्पदरात!!
मुख्य संपादक-भगवान वानखेडे
संपर्क- 8308838111





