👁 8 Views

पंढरीत भीषण आग.. अग्नीतांडवात एकाचा बळी..! ७ लाखाचे नुकसान!

पंढरीत भीषण आग.. अग्नीतांडवात एकाचा बळी..! ७ लाखाचे नुकसान!

पंढरपूर Live 20 may

पंढरपूर मधील सोमाणी पेट्रोल पंपानजीकच्या छापडी पुठ्ठ्याच्या दुकानाला रात्री लागलेल्या भीषण आगीत एकाचा बळी गेला असुन सात लाखाचे नुकसान झाले आहे.

या घटनेची खबर किशोर शंकरलाल सोमाणी यांनी पंढरपूर शहर पोलीस ठाणेत दिली आहे. त्यानुसार ही आग रात्री सव्वा एक ते ५:१० वाजणेच्या सुमारास लागली.आगीत सोमाणी एंटरप्रायझेस या दुकानातील सामान जळून 5 लाखाचे व पुठ्ठ्याचे दुकानातील सामान जळून 2 लाख रुपयेचे असे एकुण सात लाख रुपयाचे आर्थिक नुकसान झाले. संतोष रामप्रताप निषाद (कश्यप) (वय ४५), रा. पलटूपूर, ता. ललवणी, जि. फत्तेपूर, राज्य उत्तरप्रदेश या व्यक्तीचा आगीत जळुन करुण अंत झाला. ही आग विझवण्यासाठी पढरपूर नगरपरिषदेच्या अग्निशामक पथकाने कसून प्रयत्न केले.

पुढील तपास पोसई निलेश गोपाळचावडीकर हे करत आहेत!

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..
अल्पदरात!!
मुख्य संपादक-भगवान वानखेडे
संपर्क- 8308838111

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *