बीड- सोशल मीडियावर ऑडिओ क्लिप व्हायरल करत महापुरुषांचा अवमान करणाऱ्या विठ्ठल तिडके या आरोपीवर कठोर कारवाई करण्यासाठी सोमवारी मराठा क्रांती मोर्चासह विविध पक्ष संघटना, शिवप्रेमींच्या वतीने बीड जिल्हा बंदचे आवाहन करण्यात आले होते.
बीड शहरात १४ ठिकाणी दगडफेकीच्या घटनांमुळे या बंदला हिंसक वळण मिळाले. शहरातील सोमेश्वरनगर भागातही जमावाने बंद दरम्यान तीन बसवर दगडफेक केली, तर जालना रोडवर चित्रीकरण करणाऱ्या शिवाजीनगर ठाण्याचा एक पोलिस दगडफेकीत जखमी झाला.
बीड शहरातील सिद्धिविनायक कॉम्प्लेक्स भागातून सोमवारी सकाळी नऊ वाजता बंदचे आवाहन करण्यासाठी तरुणांची एक रॅली निघाली. पुढे एका रॅलीच्या चार रॅली होऊन त्या विविध भागांत गेल्याने पोलिसांना बंदोबस्ताचा अंदाज आला नाही.
शहरातील बशीरगंज भागातील आशियाना हॉटेल, ताज बिर्याणी हाऊस, आसेफनगर भागात कूलरचे दुकान, किराणा दुकान व एका साप्ताहिकाच्या कार्यालयावर दगडफेकीची घटना घडली तर मोमीनपुरा भागात आंदोलक व स्थानिक लोक समोरासमोर आले. दोन्ही बाजूने दगडफेक करण्यात आली. मोमीनपुऱ्यात काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
नगर नाका परिसरात दोन तरुणांना शिवाजीनगर पोलिसांनी ताब्यात घेतले. या तरुणांना सोडवण्यासाठी एक जमाव थेट शिवाजीनगर ठाण्यात दुपारी साडेबारा वाजता आला. तेव्हा पोलिसांनी ठाण्यात गोंधळ घालणाऱ्यांना तरुणांवर कारवाई करून बळाचा वापर करण्याची तंबी देताच जमावाने काढता पाय घेतला.
सोमेश्वरनगर भागातही जमावाने बंद दरम्यान तीन बसवर दगडफेक केली आहे. दरम्यान, बंद दरम्यान दहशत पसरवणे, शासकीय कामात अडथळा आणने, शासकीय मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी बीड शहर व शिवाजीनगर ठाण्यात तीन गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.
बीड शहर ठाण्यात अज्ञात ३५ जणांवर गुन्हा
बीड शहरातील जालना रोडवरील हॉटेल साई पॅलेसजवळ जमावाकडून दगडफेक होत असल्याचे पाहून या प्रकाराचे चित्रीकरण करण्यासाठी आलेले शिवाजीनगर ठाण्याचे पोलिस रूपेश शिंदे यांच्यावरही काही तरुणांनी दगडफेक केल्याने त्यांचे डोके फुटले. अासेफनगर येथील दगडफेकी प्रकरणी पोलिसांनी बीड शहर ठाण्यामध्ये अज्ञात ३५ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
शांतता कमिटीच्या बैठकीत दिलगिरी
बीड शहरातील मोमीनपुरा भागात बंददरम्यान दोन्ही गटांकडून दगडफेक झाल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले. मराठा व मुस्लिम समाजातील विविध पक्षांच्या नेत्यांनी तातडीने शांतता कमिटीची बैठक घेतली. तेव्हा मराठा समाजातील नेत्यांनी दगडफेकीच्या काही घटनांबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे.
आठ तालुक्यांत बंदला प्रतिसाद
जिल्ह्यातील वडवणीत सर्वपक्षीय कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. दुकाने बंद करण्याचे आंदोलकांनी आवाहन करताच व्यापाऱ्यांनी दुकाने बंद केले. शिरूर तालुक्यातील रायमोहा येथे आरोपी विठ्ठल तिडकेचा प्रतीकात्मक पुतळा जाळण्यात आला. माजलगावात फेरी काढून बंदचे आवाहन करण्यात आले तर परळी येथे दुपारी तीन वाजेपर्यंत कडकडीत बंद पाळण्यात आला.
सिरसाळा येथे आंदोलकांनी रास्ता रोको करून पोलिसांना निवेदन दिले. पाटोदा,
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..
अल्पदरात!!
मुख्य संपादक-भगवान वानखेडे
संपर्क- 8308838111










