पंढरपूर : प्रतिनिधी
मा.पोलीस अधीक्षक श्री.विरेश प्रभू सर यांचेकडे आलेले तक्रारीवरून व त्यांचे आदेशान्वये अवैध्य धंद्यावर कारवाई करणेकामी पंढरपूर शहरात पेट्रोलिंग करीत असताना सोमवारी (दि २२)पंढरपूर शहरातील नवी पेठ, एस.टी स्टँड शेजारील, अनिल नगर या ठिकाणी चालत असलेल्या अवैध्य मटका आड्यावर धड टाकण्यात आली. या कारवाईत दिलीप रतनलाल परदेशी, दिनेश अनंतलाल परदेशी, सुरेश शिवाजी शिंदे, राजू लक्ष्मण मेटकरी, शिवाजी गोवर्धन बेसुळके, दत्ताञय बाजीराव माने, शुभम दशरथ सुरवसे, एकनाथ राजाराम वाघमारे, सागर नंदू लऊळकर, किशोर चंद्रकांत हत्तीगोटे (सर्व रा पंढरपूर) यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांचाकडून सुमारे ४४३७० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला.
सदर मटका मालकाबाबत चौकशी केल्यानंतर त्यांची नावे प्रताप नारायण गंगेकर व शिवाजी आप्पा कोळी (दोघे रा. पंढरपूर) अशी आहेत. सर्व आरोपींविरुद्ध पंढरपूर शहर पोलीस ठाणेस गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच इसबावी येथील अवैध्य दारू विक्री करणा-या एकाला अटक करण्यात आली आहे. या कारवाईत सुनिल गोवर्धन अभंगराव यास ताब्यात घेण्यात आले आहे. त्याचाकडून ७२१९ किंमतीची देशी आणि विदेशी दारू जप्त करण्यात आली. त्याच्याविरूध्द पंढरपूर शहर पोलीस ठाणेस गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रसंगी मा. पोलीस अधीक्षक श्री विरेश प्रभू सर यांच्या मार्गदशनाखाली विशेष टीम मधील स.पो.नि प्रकाश वाघमारे, पोना अमृत खेडकर, मिलिंद कांबळे, अंकूश मोरे, पो.कॉ अभिजीत ठाणेकर, बाळराजे घाडगे, सुरेश लामजने, प्रविण पाटील, स्वप्निल गायकवाड, महादेव लोंढे यांच्या टिमने हे काम केले आहे.
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..
अल्पदरात!!
मुख्य संपादक-भगवान वानखेडे
संपर्क- 8308838111





