👁 10 Views

नितीन गडकरी यांचा आज षष्ठ्यब्दीपूर्ती सोहळा

नागपूर : भाजपाचे राष्ट्रीय नेते व केंद्रीय रस्ते व जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी २७ मे रोजी ६१व्या वर्षात पदार्पण करीत आहेत. यानिमित्ताने शनिवारी, कस्तूरचंद पार्क येथे सायंकाळी ५.३० वाजता गडकरी यांचा षष्ट्यब्दीपूर्ती सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा राहाणार आहेत. तर आध्यात्मिक संत श्री श्री रविशंकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान, छत्तीसगडचे मुख्यमंत्री रमणसिंह यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, आसामचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित, काँग्रेस नेते माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, शिवसेनेचे नेते उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्यासह देशभरातील सर्वपक्षीय नेते उपस्थित राहणार आहेत. देशभरातील आमदार, खासदार व विविध क्षेत्रातील मान्यवर गडकरींना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित राहतील.
या सोहळ्याच्या आयोजनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली नितीन गडकरी षष्ट्यब्दीपूर्ती गौरव समारोह समिती स्थापन करण्यात आली आहे. ऊर्जामंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे समितीचे संयोजक असून वनराईचे विश्वस्त गिरीश गांधी हे सहसंयोजक आहेत.


सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! 
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. अल्पदरात!! 
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111


Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *