👁 9 Views

बुरहान वानीचा साथीदार सबजारचा लष्कराकडून खात्मा, ८ दहशतवादी यमसदनी

त्रालमध्ये सबजारसह आणखी एक दहशतवादी मारला गेला.


गोपनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार काश्मीरमध्ये लष्कराने केलेल्या धडक कारवाईत हिजबुल मुजाहिदीनचा टॉप कमांडर सबजार अहमद भट्ट ऊर्फ अबू झरारचा खात्मा झाला. सबजार हा दहशतवादी बुरहान वानीचा जवळचा सहकारी होता. बुरहान मारला गेल्यानंतर हिजबुलचे नेतृत्व सबजारकडेच आले होते. दरम्यान, शनिवारी रात्रीपासून सुरक्षा दलांनी केलेल्या कारवाईत काश्मीरमध्ये आतापर्यंत ८ दहशतवादी ठार झाले आहेत. दरम्यान, जम्मू काश्मीर सरकारने काश्मीर खोऱ्यातील इंटरनेटसेवा बंद केली आहे. सोशल मीडियाही बंद करण्यात आले आहे.

त्रालमध्ये सबजारसह आणखी एक दहशतवादी मारला गेला. परंतु, अद्याप त्याची ओळख पटलेली नाही. आणखी एक दहशतवादी हा या परिसरात लपला असल्याची माहिती समोर आली आहे. सध्या परिसरात सर्च ऑपरेशन सुरू आहे.
बुरहानच्या खात्मानंतर सबजारला काश्मीरमध्ये हिजबुलचा नवा पोस्टर बॉय मानले जात होता. त्रालचा रहिवासी असलेला सबजार हा बुरहानच्या सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या अनेक छायाचित्र व व्हिडिओमध्ये दिसून आला होता. बुरहानचा निकटवर्तीय राहिलेला सबजार दक्षिण काश्मीरमध्ये खूप सक्रिय होता.
दरम्यान काश्मीरमधील रामपूर सेक्टर येथेही भारतीय सैन्याला मोठे यश मिळाले. नियंत्रण रेषेवर शनिवारी घुसखोरी करण्याचा प्रयत्न अयशस्वी ठरवताना लष्कराने ६ दहशतवाद्यांचा खात्मा केला. लष्कराच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार रामपूर सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेजवळ संशयित हालचाली दिसल्या. त्यानंतर घुसखोर आणि सैन्यदलात चकमक झाली. यामध्ये सहा दहशतवादी ठार झाले. या परिसरात तपास मोहीम सुरू करण्यात आली आहे. दहशतवाद्यांकडून चार एके ४७ रायफल्स आणि एक पिस्टल जप्त करण्यात आले.



                        सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! 

पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. अल्पदरात!! 
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *