👁 11 Views

शेतकरी संपाबाबत उद्या रोपळे विचारमंथन सभा


रघुनाथदादा पाटील


प्रतिनिधी

पंढरपूर : पंढरपूर तालुक्यातील रोपळे येथे उद्या सोमवार दि.29 रोजी सायंकाळी सात वाजता शेतकरी संघटनेच्यावतीने शेतकरी संपाबाबत विचार विनिमय करण्यासाठी विचारमंथन सभेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती शेतकरी संघटनेचे सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष संभाजी पवार यांनी दिली आहे.

या विचारमंथन सभेमध्ये शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष रघुनाथदादा पाटील , हेरंब कुलकर्णी, क‘ांतीसिंह नाना पाटील बि‘गेडचे अध्यक्ष शिवाजी नांदखिले, मराठवाडा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष कालिदास आपेट यांच्यासह इतर मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत. 

आयोजीत या सभेमध्ये शेतकर्‍यांच्या विविध प्रश्‍नासाठी शेतकर्‍यांच्यावतीने संप पुकारण्याबाबत विशेष चर्चा होणार आहे. तसेच शेतकर्‍यांना कर्जमाङ्ग ी मिळाली पाहीजे. गुजरात धर्तीवर महाराष्ट्रामध्येही ऊस दर मिळला पाहीजे. आयात निर्यात धोरण, शेतीमाल हमी भाव या विषयी चर्चा होणार आहे. 

तरी शेतकर्‍यांनी या विचारमंथन सभेसाठी उपस्थित रहावे असे अवाहन करण्यात आले आहे.



                        सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! 

पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. अल्पदरात!! 
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111


Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *