पंढरपूर । प्रतिनिधी,
पंढरपूर तालुक्यातील अजनसोंड येथे शौर्य बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या व मातोश्री रमाबाई आंबेडकर वाचनालय यांच्या वतीने माता रमाई भीमराव आंबेडकर यांचा ८२ वा स्मृती दिन संपन्न झाला. सुरुवातीला माता रमाई आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन नवनाथ मोरे (गुरुजी) यांच्या हस्ते करण्यात आले. व नवनाथ मोरे (गुरुजी) यांनी माता रमाई विषयी बोलताना सामाजिक संदेश दिले, मुलींना शिक्षण द्या, मुलीचे लग्न हे १८ वर्षा नंतरच करावे. तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष कमलेश बंगाळे यांनी माता रमाई आंबेडकर यांच्या कार्याविषयी माहिती सांगून कार्यक्रमाची सांगता केली.
यावेळी शौर्य बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या संस्थापक- हणमंत बंगाळे, डॉ. सचिन बंगाळे, योगेश बंगाळे (सु. रा.आंबेडकर प्रतिष्ठानचे अध्यक्ष), रुपेश गायकवाड, सिद्धार्थ बंगाळे ,दत्ता गाडे, आकाश बंगाळे, आप्पा बंगाळे, प्रीतम वाघमारे, बिंटु बंगाळे, किसान बंगाळे, सागर गायकवाड, नवनाथ बंगाळे तसेच इतरपदाधिकारी व कार्यकर्ती उपस्थित होते.





