पंढरपूर Live 27 may
पंढरपूर तालुक्यातील तुंगत येथे एकाने स्वतःच्या पत्नीचाच धारदार शस्त्राने वार करून खुन केल्याची घटना घडली आहे.
कोळसा तयार करणारे रायगड जिल्ह्यातील कुटुंब आहे.
पंढरपूर तालुका पोलिसांकडून समजलेल्या माहितीनुसार
आरोपी धुन्या घोगरकर, मु.पो. मुळशी, ता. मुधागड, जि. रामगड याने आपली दुसरी पत्नी
सखु बळीराम मोरे (४५) हिला दारूच्या नशेत धारदार शस्त्राने वार करून ठार केले.
ही घटना तुंगत, पंढरपूर येथे घडली. घरगूती कारणावरुन ही हत्या झाल्याचे समजते.
आरोपीला ता. पोलिसांनी ताब्यात घेतले असुन नथ्थु वालकी जाधव, रा. तुंगत, ता. पंढरपूर याने दिलेल्या फिर्यादीनुसार ता. पोलीस ठाणेत आरोपीविरूध्द गुन्हा दाखल आहे.
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..
अल्पदरात!!
मुख्य संपादक-भगवान वानखेडे
संपर्क- 8308838111





