एकीकडे मुख्यमंत्री पत्रकार संरक्षण कायद्याबाबत घसा ताणून आग्रही असतात आणि दुसरीकडे त्यांच्याच खात्यातील कर्मचारी पत्रकारांना दमदाटी करुन मारहाण करत डांबून ठेवतात. या वृत्तीचा निषेध.
पुणे: आंबेगाव तालुक्यातील घोडेगाव येथिल घटना….IBN लोकमत च्या पत्रकाराला पोलीस उपनिरीक्षकाची मारहाण..
मंचर वरून घोडेगाव येथे बातमीसाठी जात असताना घोडेगाव च्या जवळ एक मृतदेह आढळला असताना तिथे घटनास्थळी जावून व्हिडीओ घेत असताना. पोलिस उपनिरीक्षक के.के.भालेकर यांनी पत्रकारांना घटनास्थळ खाली करा असे बजावले. नाहीतर तुम्ही मृतदेह उचलता का?? असा प्रतिप्रश्न करत पत्रकारांना अरेरावीची भाषा वापरली.. तसेच ‘आयबीएन लोकमत’चे पत्रकार रायचंद शिंदे यांना मारहाण करत गाडीत टाकून तुमच्या वरती गुन्हाच दाखल करतो अशा शब्दांत पोलिसांच्या मुजोरी पहायला मिळाली. यावेळी झी 24 तास चे प्रतिनिधी साईदीप ढोबळे, जय महाराष्ट्र चे सुनील थीगळे, महाराष्ट्र 1 चे हेमंत चापुढे यासह इतरही पत्रकारांना सर्व पोलीसानी अरेरावी केली.
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..
अल्पदरात!!
मुख्य संपादक-भगवान वानखेडे
संपर्क- 8308838111






