सांगोला रविंद्र कांबळे
सांगोला नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत विविध १५९ विषय ठेवण्यात आले.या पैकी ४०विषयांवर चर्चा ३ तहकूब तर उर्वरित विषयांवर सुचाना उपसूचना आल्याने एकमताने ठराव झाले नाहीत.नगरपालिकेतील अंतर्गत गटबजीमुळे शहराचा विकास खुटला नागरिकांची प्रतिक्रिया. ✍🏻-सांगोला ते मिरज रस्त्यालगत बौद्ध समाज, होलार व अल्पसंख्याक समाजातील भूमिहीन गरिबी नागरिकांची 50% कुटुंबे रहिवाशी आहेत. या रस्ताा रुंदीकरणामुळे अनेक कुटुंबावर अन्याय झाला आहे. रस्ता रुंदीकरण करण्याकरीता प्रशासनाने रस्त्यालगत 100 फुट आतमध्ये रुंदीकरण हद्द ठरवणारे खांब लावले आहेत त्यामुळे गरीब व कष्टकरी कुंटूंबाच्या राहत्या घरावर जमीनदोस्त होण्याची टांगती तलवार आहे, अशा परिस्थीत सामान्य कुंटुबाला दिलासा देण्याच्या दृष्टीने रस्ता रुंदीकरणामुळे विस्थापित होणाऱ्या नागरीकांचे पुनर्वसन करण्यात यावे या मागणीसाठी आमदार प्रशांत परिचारक यांना निवेदनाव्दारे मागणी करण्यात आली आहे.
✍🏻 धनगर समाज सेवा मंडळ, सांगोला यांच्यावतीने पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या 292 व्या जयंती महोत्सव सोहळ्यानिमित्त मंगळवार दि.30 मे आणि बुधवार दि.31 मे या कालावधीत सांगोला शहरातील तहसिल कार्यालयासमोरील पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यानजीक विविध कार्यक्रमांचे आयोजन केले असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष संदिपान नरूटे यांनी दिली.
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..
अल्पदरात!!
मुख्य संपादक-भगवान वानखेडे
संपर्क- 8308838111





