👁 11 Views

डॉ.पंजाबराव देशमुख रुग्णालयात 4 शिशुंचा मृत्यू; मनसे कार्यकर्त्यांकडून डॉक्टरला माराहाण

अमरावती- डॉ.पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात रविवारी मध्यरात्री 4 नवजात शिशुंचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. चारही नवजात शिशुंवर एनआयसीयूमध्ये उपचार सुरु होते. एकाच वेळी चार नवजात शिशुंचा मृत्यू झाल्याने त्यांचे नातेवाईक संतापले आहेत. डॉक्टरला अटक करत नाही तोपर्यंत पोस्टमार्टम करू देणार नाही, असा संतप्त नातेनाइकपवित्रा मृत बालकांच्या वडिलांनी घेतला आहे.


दुसरीकडे, मनसे कार्यकर्त्यांनी डॉ.भुषण कट्टा यांना माराहाण केल्याची माहिती मिळाली आहे. बच्चु रेळे आणि संतोष बद्रे अशी मारहाण करणार्‍या कार्यर्त्यांची नावे आहेत.

मिळालेली माहिती अशी की, चारपैकी दोन महिलांची प्रसुती याच हॉस्पिटलमध्ये झाली होती. त्यापैकी एक महिला चांदूर बाजार येथील आहे. या प्रकारामुळे नातेवाईक संतप्त झाले आहेत. याप्रकरणी गाडगे नगर पोलिस ठाण्यात रुग्णालय प्रशासनाविरुद्ध तक्रार दाखल केली आहे.


काय म्हणतात डॉक्टर..
रुग्णालयात येणाऱ्या महिला ह्या ग्रामीण भागातून येतात. त्यांना सकस आहार मिळत नाही. त्यामुळे त्यांचे अर्भकही अशक्त असते, असे डॉक्टरांनी सांगितले आहे.


काय म्हणतात संतप्त नातेवाइक..
रूग्णालयात डॉक्टर उपलब्ध नसल्याने प्रसुत महिला आणि तिच्या बालकाला वेळेत उपचार मिळत नाहीत. त्यामुळेही बाळांचा आणि मातांवर मृत्यू ओढावतो, असा गंभीर आरोप संतप्त नातेवाइकांनी केला आहे.


दरम्यान, गोंदियात 15 दिवसांत 18 नवजात शिशुंचा मृत्यू..
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच गोंदियाच्या गंगाबाई शासकीय रुग्णालयात 15 दिवसांत 18 नवजात शिशुंचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली होती. गोंदियात गेल्या दीड महिन्यात एकूण 43 बालके दगावल्याची माहिती मिळाली आहे.
http://www.pandharpurlive.com/2017/05/4.html

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. अल्पदरात!! 

मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111

.




Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *