महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल उद्या, मंगळवारी (ता. ३० मे) जाहीर होणार आहे. ११ वाजता विभागवार निकाल घोषित केले जाणार आहेत. तर दुपारी १ वाजता विद्यार्थ्यांना ऑनलाईन निकाल पाहता येणार आहे.
बारावी निकालाबाबत गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर अफवांचे पीक आले होते. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांच्या मनात गोंधळाचे वातावरण होते. मात्र, आता बोर्डाने निकालाची तारीख जाहीर केल्याने विद्यार्थी आणि पालकांना दिलासा मिळाला आहे. २८ फेब्रुवारी ते २५ मार्च दरम्यान बारावीची परीक्षा घेण्यात आली होती. यावर्षी जवळपास १५ लाख विद्यार्थी परीक्षेला बसले होते.
निकाल पाहण्यासाठी https://goo.gl/Wizi8p
Posted inMaharashtra
बारावीचा निकाल उद्या; दुपारी १ पासून ऑनलाईन पाहता येणार
पंढरपूर Live






