👁 8 Views

65 वर्षीय साधूवर महिलेने केला बलात्कार

जयपूर, दि. 28 – पुरुषाने महिलेवर बलात्कार केल्याच्या घटना तुम्ही वाचल्या असतील. पण राजस्थानमध्ये एका महिलेने 65 वर्षीय साधूवर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. 65 वर्षीय पीडित साधूने याबाबत पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीत साधूने महिलेवर बलात्काराचा आरोप केला असून आपली फसवणुक आणि ब्लॅकमेल केल्याचा आरोपही केला आहे.

प्राप्त माहितीनुसार, ही घटना राजस्थानातील बुंदी येथील पोलिस ठाणे परिसरातील आहे. येथील गावात राहणाऱ्या एका 65 वर्षीय साधूने पोलिसांत तक्रार दिली आहे की, गावात राहणाऱ्या एका महिलेने आपल्यासोबत बलात्कार केला. तसेच, लैंगिक अत्याचाराच्या आरोपात अडकविण्याची धमकीही दिली. धमकी देऊन संबंधीत महिलेने आपल्याकडून 3 लाख रूपयेही लाटले आहेत.

पीडित साधूने म्हटले आहे की, आरोपी महिलेच्या पतीने आपल्याकडून 20 हजार रूपये उधार घेतले होते. पैसे परत करण्याची मुदत संपल्यावर आपण त्या महिलेच्या पतीकडे पैसे परत मागितले. तेव्हा ती महिला आणि तिच्या पतीने संगनमताने आपल्यासोबत गैरकृत्य केले. तसेच, आपल्याला बलात्काराच्या आरोपाखाली अडकविण्याची धमकीही दिली. तसेच, मानसीक छळ करत दोघांनी मिळून आपल्याकडून 3 लाख रूपयेही लाटले. यानंतरही दोघा पती-पत्नीचे मन भरले नाही. त्यांनी माझ्याकडे आणखी 2 लाख रूपयांची मागणी करत असल्याचे साधूचे म्हणने आहे.

दरम्यान, पती-पत्नीच्या नेहमीच्या त्रासाला कंटाळून अखेर आपण पोलिसांत तक्रार दिल्याचे साधू सांगतो. घटनेचा पुरावा म्हणून साधूने पोलिसांना मोबाईल फोनचे रेकॉर्डींगही दिले आहे. पोलिसांनी गुन्हा नोंद करून घेतला आहे. तसेच, आरोपी महिलेला ताब्यातही घेतले आहे. महिलेचा पती अद्याप फरार आहे. पोलिस पूढील तपास करत आहेत. या वृत्ताची माध्यमातही चर्चा आहे.

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..
अल्पदरात!!
मुख्य संपादक-भगवान वानखेडे
संपर्क- 8308838111

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *