👁 7 Views

पंढरपूर शहर कॉग्रेसच्या वतीने अहिल्यादेवी होळकर जयंती साजरी

पंढरपूर शहर कॉग्रेस कमेटी व समाजसेवक दिपक येळे मित्रमंडळाच्या वतीने राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची 292 वी जयंती मोठया उत्साहाने साजरी करण्यात आली.येथील येळेवस्ती येथे आयोजीत या कार्यक्रमात सहकार शिरोमणी साखर कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे यांच्या हस्ते प्रतिमेचे पुजन करण्यात आले.यावेळी पंढरपूर शहर कॉग्रेस कमेटीचे अध्यक्ष ऍड.राजेश भादुले,नगरसेवक महादेव भालेराव,महादेव धोत्रे,नगरसेवक विवेक परदेशी,माऊली हळणवर,अदित्य फत्तेपुरकर,राहुल हाके,नागेश गंगेकर,बाळा साहेब गडदे,अमर सुर्यवंशी,वीर शेख,शितल येळे,मामा फलटणकर,गणेश पवार,परमेश्‍वर डांगे,संतोष बंडगर,सुरेश ढोणे,बिरु ढोणे,संग्राम शिंदे,संकेत कुलकर्णी,अशोक घोडके,डि.राज सर्वगोड,किरण घाडगे,किरण पाटील,मसुरे सर,श्री थोरबोले,श्री भोजने,अजय खांडेकर,वैभव डोके,रोहीत कोळेकर,अजिंक्य कोळेकर,विक ी कोळेकर,बंकी येळे,अजिंक्य डोईफोडे,गणेश कोळेकर,पांडुरंग डोके विनायक येळे,निशिकांत येळे,निखील शेंडगे,आनंद झिंझुर्टे आदी उपस्थित होते.
         यावेळी बोलताना चेअरमन कल्याणराव काळे यांनी पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर वधु-वर सुचक मंडळाच्या माध्यमातून करण्यात येत असलेले कार्य आदर्श असून सर्वसामान्य समाजबांधवांसाठी अतिशय मोलाचे आहे.राजमात अहिल्यादेवी होळकर यांनी आपले संपुर्ण जिवन सामान्य लोकांच्या सुखासाठी व्यतीत केले.त्यांनी देशभरातील विविध तिर्थक्षेत्राच्या ठिकाणी त्याकाळी दुरद्रष्टीने निर्माण केलेल्या सुविधा आजही आदर्शवत आहेत.
      यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना दिपक येळे यांनी मंडळाच्या वतीने आयोजीत विविध उपक्रमांची माहीती देवून धनगर समाज हा भटका समाज आहे,दर्‍या खोर्‍यातून विखुरलेला समाज आहे.या समाजाच्या अडचणी लक्षात घेवून आपण विविध उपक्रमांचे संस्थेच्या माध्यमातून आयोजन  करीत आलो असून त्यासाठी आपणा सर्वांचे मोलाचे सहकार्य लाभत असल्याचे सांगीतले.
       या कार्यक्रमाचे प्रास्ताविक ऍड.राजेश भादुले यांनी केले तर शेवटी आभार शितल येळे यांनी मानले.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दिपक येळे मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. 

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. अल्पदरात!! मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111


Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *