👁 10 Views

शासकीय कर्ज भरणा कसूर खातेदारांच्या गहाण संपत्तीचा लिलाव 7 जुलैला

पंढरपूर दि.31 : शासनाच्या खादी ग्रामोद्योग विभागाकडून घेतलेल्या कर्ज रक्कमेची परतफेड करण्यास कसूर केलेल्या तालुक्यातील खातेदारांच्या गहाण संपत्तीचा लिलाव 7 जुलै 2017 रोजी तहसिल कार्यालय, पंढरपूर येथे करण्यात येणार आहे. हा लिलाव महाराष्ट्र जमिन महसूल संहिता 1966 च्या कलमान्वये थकबाकीदारांना क्रमांक 1 व 2 ची नोटीस देऊन आणि कलम 180 अन्वये थकबाकीदारांना क्रमांक 3 ची नोटीस देऊन जप्त केलेल्या मालमत्तेचा लिलाव करण्यात येत आहे. जाहीर लिलावातून प्राप्त होणाऱ्या रक्कमेतून आरआरसीची रक्कम शासन जमा करण्यात येणार असल्याचे  तहसिलदार अनिल कारंडे यांनी कळविले आहे

अ.क्र
थकबाकीदाराचे नाव
मालमत्तेचे वर्णन
जमिनीचे क्षेत्र
वसुल पात्र रक्कम
दुय्यम निबंबधक यांच्याकडील मूल्यांकन
1
अनिल यशवंत कोरके
रा. भोसे
भोसे
ग.नं.433/3
0-75
218470/-
         876000/-
2
दिलीप किसन वाखरकर
रा.हरिदास वेस, पंढरपूर
पंढरपूर
ग.नं.2075/1
5.00 चौ.मी
28770/-
             20100/-
3
इब्राहीम बशीर बोहरी
रा. पंढरपूर
स.न.3099/1,
3099/11,
3398/6/7/32
194.78 चौ.मी
89237/-
955000/-
4
महादेव रामा होनकळसे रा. पुळूजवाडी व नारायण भानुदास घोडके रा.औंढी. ता. मोहोळ
मौजे पुळूज येथील
ग.नं.241/2
हे.1.00 आर
183565/-
7125000/-
 या खातेदारांनी शासनाकडून घेतलेले कर्ज परत करण्यास कसूर केली असल्याने त्यांच्या गहाण संपत्तीचा लिलाव करण्यात येत आहे. लिलावाच्या दिवशी खरेदीदार म्हणून जाहीर केलेल्या व्यक्तीस त्याने बोली केलेल्या रक्कमेच्या 25 टक्के अनामत रक्कम तात्काळ भरावी लागेल. लिलाव करण्यात येणाऱ्या मालमत्तेची संपूर्ण माहिती आवश्यक असल्यास तहसिल कार्यालय पंढरपूर येथील जमा-2  संकलन विभागाशी संपर्क साधावा. तसेच लिलावात भाग घेऊ इच्छिणाऱ्या व्यक्तीनी लिलावाच्या दिवशी सकाळी 11.00 वाजले पासून उपस्थित रहावे असे तहसिलदार अनिल कारंडे यांनी कळविले आहे.

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. अल्पदरात!! मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111


Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *