👁 10 Views

एम. आय टी . ज्युनिअर कॉलेजचा निकाल १००%

पंढरपूर : फेब्रु.-मार्च २०१७ मध्ये महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाच्या

वतीने घेण्यात आलेल्या इयत्ता १२ वीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला, या मध्ये विश्वशांती गुरुकुल

वाखरी एम. आय. टी ज्युनिअर कॉलेज चा निकाल १००% लागला आहे. इयत्ता १२ वीच्या परीक्षेसाठी या

वर्षी ४६ विद्यार्थी बसले होते, या मधील सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून १३ विद्यार्थी विशेष प्राविण्यासह

व ३३ विद्यार्थी प्रथम श्रेणी मध्ये उत्तीर्ण झाले आहेत. विद्यालयातील हृषीकेश घुले याने ९०.१० % गुण

मिळवून प्रथम क्रमांक मिळविला आहे. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. विश्वनाथ

कराड व एम. आय. टी. पुणे च्या कार्यकारी संचालिका प्रा. स्वाती कराड-चाटे, प्रकल्प संचालक डॉ. प्रसाद,

कॉलेजचे प्राचार्य श्री. राव यांच्यासह सर्व शिक्षकांनी अभिनंदन केले आहे. दरवर्षी प्रमाणे याही वर्षी एम.

आय. टी ज्यूनिअर कॉलेजचा निकाल १०० % लागल्यामुळे पालकांमधून अभिनंदन करण्यात आहे.

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. अल्पदरात!! मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111


Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *