मुंबई. दि. 31 : अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सह्याद्री अतिथीगृह येथे त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
या प्रसंगी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, पशु संवर्धन, दुग्ध विकास मंत्री महादेव जानकर, वित्त व नियोजन राज्यमंत्री दीपक केसरकर,आमदार सर्वश्री प्रशांत ठाकूर, सुहास पारवे, प्रशांत बंब, श्रीमती मनीषा चौधरी, मुख्य सचिव सुमित मलिक, सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. भगवान सहाय यांच्यासह इतर अधिकारी कर्मचाऱ्यांनीही अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.






