👁 10 Views

लिव ईन रिलेशनशीप- भाग सहा


लिव ईन ( भाग सहा )



क्रमशः…..



डोक बधीर झाल …परत आलो बागेतुन ..दाढी आटपली …शॉवरखाली उभा राहिलो बराच वेळ …..
तयारी केली चलो अॉफिस ….तेव्हढ्यात दरवाज्याची बेल वाजली …..
समोर अनोळखी बाई ..
साखर हवेय थोडीशी ……
माफ करा मॕडम ….मी ऐकटाच रहातो ईथे ….
अहो मी कालच रात्री शिफ्ट झालेय ..तुमच्या बाजुला ..मला वाटल जुने असाल तुम्ही …..
नाही मलाही तिन दिवस झालेत …,
,sorry ,.,,तुम्हाला त्रास दिला ……have a nice day ,,,,by the way मी जान्हवी तुम्ही ..????
मी रवी …..
..जान्हवी सुंदर होती हसरी ….बोलके डोळे ….बिंधास्त ….,
चला दिवसाची सुरवात तर छान झाली …
बिल्डिंग उतरुन खाली आलो ….लेटरबॉक्स बघीतला …तीन दिवसात कोण पाठवेल पत्र ..
आज आबांशी बोलल पाहिजे …..
आमच अॉफिस लागत त्या अगोदर ऐक सिंग्नल लागतो …
mseb च्या डीपी खाली ऐक लहान मुलगी फुल विकायला बसते …मोगरा सोनचाफा माझा जिव की प्राण ….
कशी दिली ग फुल ???
दादा दहाला तीन …
दहाला दोन दे की ….
ती हसली ….सावळी खळी पडली तिच्या गालावर …
चार करुन देते …..घ्या …
रोज ठेवशील माझ्यासाठी …..
हो गावली तर ठेवेन दादा ….
तीन ओंजळीत फुल टाकली ..
ओंजळ नाकाजवळ नेवुन तो नादगंध भरुन घेतला मनात …
हलकेच तीच्या डोक्यावर टपली मारुन मी निघालो ….
निरागस सौंदर्य काय ते तीच्यायाकडे बघुन कळल मला …त्याला तुमच्या त्वचेचा रंग …महागडे कपडे ..फॕशन जबाबदार नाहित ….निर्मळ मन पाहिजे बास ……
अॉफिसात नेहमी प्रमाणे लवकर पोचलो …नारायण काका होते …
काय काका कस चाललय …..
मजेत सर …आज खुश आहात ….
हो आज फुल मिळाली आवडती ….
सोनचाफा ….
मला खुप आवडतो …
सिंग्नल पाशी भेटली ना ….
हो …
छान आहे मुलगी सुंदर …प्रेमळ ….खुप छान फुले मिळतात …..तीच्याकडे ..,,
तीनेच लावलेत झाड …तीच करते सगळ …पाणी घाल …फुल विक ….हुशार आहे ….नववीत होती आता दहावीत जाईल ….
शाळा सुरु झाली की दुपारी चारनंतर बसते ….सगळी फुल तिच्याच हातची …..
काका ऐवढी माहिती तुम्हाला ?????
हो सर माझीच मुलगी आहे प्राजक्ता …..
उम्या


क्रमशः…..




सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. अल्पदरात!! 

मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111



Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *