👁 11 Views

पंढरपूर तालुक्यात उत्सफुर्तपणे शेतकरी बंद..! अनेक गावात रस्त्यावर दुध ओतले.. भाजीपाला पण रस्त्यावर उतरवला..!



पंढरपूर Live 1 jun 2017

पंढरपूर तालुक्यातील विविध गावांमधून शेतक-यांनी उत्स्फुर्तपणे शेतकरी बंदला प्रतिसाद दिला आहे.

अनेक गावात विक्रीस नेण्याऐवजी भाजीपाला रस्त्यावर उतरवला तर अनेक ठिकाणी दुध रस्त्यावर ओतुन शेतक-यांनी आपला आक्रोश व्यक्त केला.

पळशी, सुपली, उपरी, गादेगाव, रांझणी या गावातील शेतकरी बांधवांनी रस्त्यावरती दूध ओतून दिले. भाजीपाला विकण्यासाठी निघालेल्या शेतकऱ्यांना थांबवून त्यांचा भाजीपाला रस्त्यावरती उतरवला.

अनेक ठिकाणी रावसाहेब दानवे, माधव भंडारी व भाजप सरकारचा निषेध केला गेला. शासनाने वारंवार
शेतक-यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याने आजच्या बंदच्या रुपाने
शेतक-यांच्या मनात ब-याच वर्षापासून शासनाविरुध्द खदखदत असलेला असंतोष उफाळून बाहेर आल्याचे दिसुन आले.


सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. अल्पदरात!! 

मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *