👁 9 Views

म्हणून आमीर खान सोशल मीडियापासून लांब राहतो!

मुंबई

बॉक्स ऑफिसवरील कमाईच्या लढतीत आमीर खानच्या ‘दंगल’नं भव्यदिव्य ‘बाहुबली २’ला चीतपट केलं .चीनमध्ये तर दंगलने केवळ तीन आठवड्यात रेकॉर्ड ब्रेक अशी तब्बल ७२५ कोटींची कमाई केली होती. यामुळं चीनमध्ये ट्विटर सारख्या विबो या सोशल नेटवर्कींग साइटवर आमिर खान सर्वात जास्त फॉलो केला जाणारा भारतीय ठरला आहे.

बॉक्स ऑफिसवर गल्ला जमवण्यात जरी आमीर पुढे असला तरी सोशल मीडियाच्या बाबतीत मात्र पाठीमागे आहे. यावर आमीर म्हणतो की, सोशल मीडिया हे चाहत्यांशी संवाद साधण्याचं चांगलं माध्यम असलं तरी मी लोकांमध्ये रमणारा आणि खूप बोलणारा वगैरे नाही. अन् तेवढा वेळही माझ्याकडे नसतो. त्यामुळं सोशल मीडियावर अॅक्‍टीव्ह राहू शकत नाही आणि महत्त्वाचं म्हणजे मला एखाद्या विषयावर पटकन व्यक्त व्हायला आवडत नाही. मी माझ्या कामातून आणि माझ्या सिनेमातूनच प्रेक्षकांशी संवाद साधत असतो , हे माध्यम मला जास्त आवडत. त्यामुळं यापुढे देखील सोशल मीडियावर माझा वावर मी वाढवेन असं मला वाटत नाही.

दंगलच्या या यशानंतर आमीर त्याच्या बहुचर्चित ठग्स ऑफ हिंदुस्तानसाठी या चित्रपटासाठी माल्टामध्ये जाऊन ट्रेनिंग घेतोय.चित्रपटात खूप अॅक्शन सीन्स असून यशराज बॅनरची निर्मिती असणाऱ्या या चित्रपटात बिग बी अमिताभ बच्चन आणि आमिर खान पहिल्यांदाच एकत्र काम करणार आहेत.

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. अल्पदरात!! 

मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *