👁 11 Views

भारतीय लष्करातही बदली घोटाळा, लेफ्टनंट कर्नलला अटक

सीबीआयच्या विशेष न्यायालयाने सोमवारपर्यंत कोठडी सुनावली आहे

                                            संग्रहित छायाचित्र (एएनआय)

केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) लष्कराच्या मुख्यालयातील कथित बदल घोटाळ्याचा भंडाफोड केला आहे. याप्रकरणी एका लेफ्टनंट कर्नल आणि मध्यस्थाला अटक करण्यात आली आहे. इच्छित स्थळी बदली आणि पोस्टिंगसाठी लाखो रूपये घेण्यात येत होते. गोपनीय माहितीच्या आधारावर सीबीआयने लेफ्टनंट कर्नल रंगनाथ सुवर्णमणी मोनी आणि गौरव कोहलीला बेंगळुरूच्या एका लष्करी अधिकाऱ्यांच्या बदलीप्रकरणी २ लाख रूपयांची लाच घेतल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. दरम्यान लेफ्टनंट कर्नल रंगनाथ सुवर्णमणी मोनी आणि गौरव कोहलीला सीबीआयच्या विशेष न्यायालयाने सोमवारपर्यंत कोठडी सुनावली आहे.


सीबीआयच्या एफआयआरमध्ये एका ब्रिगेडिअरच्याही नावाचा समावेश आहे. पण आरोपींच्या यादीत त्याच्या नावाचा समावेश नाही. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या संगनमताने लष्करी मुख्यालयात गेल्या अनेक दिवसांपासून हे रॅकेट सुरू असल्याचा सीबीआयला संशय आहे. सीबीआयच्या एफआयआरमध्ये लाचेच्या रकमेसाठी हवाला माध्यमाचा वापर होत असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे.
सीबीआयने लष्कराच्या मुख्यालयात कार्यरत असलेले लेफ्टनंट रंगनाथ सुवर्णमणी मोनी, हैदराबादचे लष्करी अधिकारी पुरूषोत्तम, गौरव कोहली आणि बेंगळुरूमध्ये कार्यरत असलेले लष्करी अधिकारी एस. सुभाष यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. लेफ्टनंट मोनी हे कोहली आणि पुरूषोत्तम यांच्या मदतीने अधिकाऱ्यांच्या बदल्या करत असत.

दरम्यान, महाराष्ट्रातही पोलिस अधिकाऱ्यांच्या बदलीसाठी कार्यरत असलेल्या रॅकेटचा भंडाफोड शुक्रवारी करण्यात आला आहे. याप्रकरणी चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. अल्पदरात!! 

मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111


Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *